मुंबई - परिवहन विभागाने लर्निंग लायसन्ससाठी फेसलेस सुविधा उपलब्ध केल्यानंतर मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर नवी समस्या निर्माण झालेली आहे. लर्निंग लायसन्सनंतर पक्के अर्थात परमनंट लायसन्ससाठी मुंबईतील प्रत्येक आरटीओमध्ये दररोज हजारो चालक स्लॉट बुकिंगसाठी धडपडत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने दिले होते. (RTO Will Open on Saturdays and Sundays) त्यानंतर आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शनिवार व रविवारी आरटीओ खुले करून मुदत संपत आलेल्या लर्निंग लायसन्स धारकांना चाचणीसाठी स्लॉट उपलब्ध होणार आहे. (RTO office Open) त्यामुळे हजारो वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे
ईटीव्ही भारताच्या वृत्ताची दखल-
वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना साठी फेसलेस सेवा सुरू केली आहे. या सेवेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने परिवहन विभागासमोर एक मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्स काढण्याच्या संख्येवर परिवहन विभागाचे नियंत्रण नसल्याने एकाच दिवशी लाखो चालक लर्निंगसाठी अर्ज करत आहेत. लर्निंग लायसन्स काढल्याच्या एका महिन्यापासून सहा महिन्यांपर्यंतच्या अवधीत चालकांना परमनंट लायसन्स काढण्याची मुभा आहे. त्यामुळे आरटीओ कार्यकायात परमनंट लायसन्ससाठी मुंबईतील प्रत्येक आरटीओमध्ये दररोज हजारो चालक स्लॉट बुकिंगसाठी धडपडत आहेत.
लायसन्स धारकांना चाचणीसाठी स्लॉट उपलब्ध करून देणार
आता शनिवार व रविवारी आरटीओ खुले करून मुदत संपत आलेल्या लर्निंग लायसन्स धारकांना दिलासा देण्याचे आवाहन चालकांनी केले आहे. याबाबद ईटीव्ही भारतने बातमी प्रकाशित केली होती. या वृत्ताची दखल घेऊन मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शनिवार व रविवारी आरटीओ खुले करून मुदत संपत आलेल्या लर्निंग लायसन्स धारकांना चाचणीसाठी स्लॉट उपलब्ध करून देणार आहे.
२ हजार स्लॉट उपलब्ध-
नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारीही पक्के लायसन्साठीची चाचणी घेतली जाणार आहे. २९ आणि ३० जानेवारी या दोन दिवशी स्थानिक सुट्टी दिवशी चालकांना ही सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे शनिवार व रविवारी चालकांना चाचणीसाठी स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येत्या शनिवारी व रविवारी अळा दोन दिवशी प्रतिदिन एक हजार प्रमाणे एकूण २ हजार स्लॉट उपलब्ध असतील.
दररोजचे ७०० स्लॉट हे सर्वसाधारण चालकांसाठी आहेत
महत्त्वाची बाब म्हणजे ज्या चालकांच्या लर्निंग लायनन्सची मुदत संपत आली आहे, अशा चालकांना पक्के लायसन्स काढण्यासाठी दररोज ३०१ स्लॉट राखीव ठेवण्यात आले आहेत. याउलट दररोजचे ७०० स्लॉट हे सर्वसाधारण चालकांसाठी आहेत. तरी नागरिकांनी ऑनलाईन स्वरुपात स्लॉट बुकिंग करण्याचे आवाहन मुंबई मध्यच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे.
हेही वाचा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात वातावरण तापले, शिवडी न्यायालयात भाजपकडून याचिका दाखल