ETV Bharat / city

Rickshaw Driver set himself on fire : पोलीस सहकार्य करत नसल्याने ठाण्यात रिक्षाचालकाने घेतले स्वत:ला पेटवून

ठाण्यातील पोलीस ठाण्यात ( thane Police stations ) एका रिक्षाचालकाने स्वत:ला जाळून घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गेल्या वर्षी त्याची रिक्षा चोरीला गेली होती. मात्र पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप करत या चालकाने स्वत:ला जाळून घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Rickshaw Driver set himself on fire
रिक्षाचालकाने घेतले स्वत:ला पेटवून
author img

By

Published : Aug 2, 2022, 5:27 PM IST

ठाणे - ठाण्यातील पोलीस ठाण्यात एका रिक्षाचालकाने स्वत:ला जाळून घेतल्याची ( Rickshaw Driver Set Himself On Fire ) खळबळजनक घटना समोर आली आहे. गेल्या वर्षी त्याची रिक्षा चोरीला गेली होती. मात्र पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप करत या चालकाने करत स्वत:ला जाळून घेतल्याचा खळबळजनक घटना समोर आली आहे. हि घटना भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. स्वतःला जिवंत पेटवून घेणाऱ्या रिक्षाचालकावर रुग्णालयात उपचार सुरू ( rickshaw driver undergoing with treatment ) असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अंगावर रासायनिक पदार्थ ओतून जाळून घेतले - भिवंडी येथे रिक्षाचालक हा भिवंडीतच कुटुंबासह राहतो. त्याची गेल्यावर्षी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रिक्षा चोरीला गेल्याने त्याने नारपोली पोलीस ठाण्यात ( Narpoli Police Station ) रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र वर्ष होत आले तरीही रिक्षाचा तपास लगत नसल्याने सोमवारी रात्रीच्या सुमारास हा रिक्षाचालक नारपोली पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळेस त्याने पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. तसेच पोलिसांच्या ११२ मदत क्रमांकावरही संपर्क साधला. त्यानंतर तो पोलीस ठाण्याच्या बाहेर पडताच, त्याने अंगावर रासायनिक पदार्थ ओतून जाळून घेतले. तर घटना पाहताच पोलिसांनी तात्काळ त्याला अडवून रुग्णालयात दाखल केले. हा रिक्षाचालक २२ टक्के होरपळून जखमी झाला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान त्याची रिक्षा चोरीला गेली नसून रिक्षावर लोन असल्याने अर्थपुरवठा करणाऱ्या कंपनीने जप्त केल्याचा माहितीही पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - Complaint Filed Against CM : औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार; 'हे' आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.