ETV Bharat / city

Aditya Thackeray : केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी म्हणजे दिल्लीचे महाराष्ट्रावर आक्रमण -आदित्य ठाकरे - आदित्य ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका

शिवसेना नेत्यांवर केंद्रीय तपास संस्थांच्या धाडी पडत आहेत. (Central Investigation Agency) या धाडी म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचे महाराष्ट्रावर आक्रमणच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मात्र, महाराष्ट्र झुकणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
author img

By

Published : Mar 8, 2022, 12:20 PM IST

Updated : Mar 8, 2022, 12:30 PM IST

मुंबई - शिवसेना नेत्यांवर केंद्रीय तपास संस्थांच्या धाडी पडत आहेत. या धाडी म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचे महाराष्ट्रावर आक्रमणच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. (Aditya Thackeray On CBI) मात्र, महाराष्ट्र झुकणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

व्हिडिओ

आताही दिल्लीचे हे आक्रमणच आहे

शिर्डी देवस्थान विश्वस्त आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरावर आज सकाळी आयटीने छापेमारी सुरू आहे. (Central Investigation Agency In Mumbai )बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याचा आयटीचा संशय असल्याने कनाल यांची तपासणी सुरू आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता, महाराष्ट्रात या आधी देखील अशी आक्रमणे झाली आहेत. आताही दिल्लीचे हे आक्रमणच आहे, असे म्हणावे लागेल. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात निवडणूक लागेल, अशी शक्यता निर्माण झाली. भाजपला महाविकास आघाडीची भीती वाटायला लागली, तेंव्हापासून सगळं सुरू आहे असही ते म्हणाले आहेत.

सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत

युपीमध्ये, हैदराबादमध्ये अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या होत्या. पंजाबमध्ये देखील भाजपने हाच फॉर्म्युला वापरला. आता महाराष्ट्रात निवडणूक येऊ घातल्याने इथे सगळं सुरू आहे. सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत. महाराष्ट्र झुकणार नाही, थांबणार नाही असे सांगत आदित्य ठाकरे यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Today press conference : आज संजय राऊतांची पत्रकार परिषद! कुणावर 'बाण' सोडणार?

Last Updated : Mar 8, 2022, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.