ETV Bharat / city

BDD Chaw : बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात, जलद गतीने पूर्ण करणार - मंत्री जितेंद्र आव्हाड - मंत्री जितेंद्र आव्हाड

नायगाव येथील बीडीडी चाळ ( BDD Chawl ) पाडल्यानंतर रिक्त जागी नव्या इमारतींच्या बांधकामाला प्रारंभ करून नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत असून बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच जलद गतीने पूर्ण करून मार्गी लावला जाईल, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांनी व्यक्त केला.

मंत्री जितेंद्र आव्हाड
मंत्री जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jan 4, 2022, 7:57 PM IST

मुंबई - नायगाव येथील बीडीडी चाळ ( BDD Chawl ) पाडल्यानंतर रिक्त जागी नव्या इमारतींच्या बांधकामाला प्रारंभ करून नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत असून बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच जलद गतीने पूर्ण करून मार्गी लावला जाईल, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांनी व्यक्त केला. मुंबईतील नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक 5 बी आज निष्कासित करून पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याठिकाणी नवीन इमारतीच्या बांधकामाला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे.

प्रत्येक दगडाला इतिहास आहे

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना मंत्री आव्हाड म्हणाले, बीडीडी चाळींच्या प्रत्येक दगडाला इतिहास असून सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची साक्ष देणाऱ्या या चाळी आहेत. सुमारे शंभर वर्षे जुन्या या चाळीतील इमारतींच्या पुनर्विकासाद्वारे येथील रहिवाशांना सर्व सुविधायुक्त मोठे घर देऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणेबाबत अनेक वर्षापासून पाहिलेले स्वप्न आज नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक 5 बी निष्कासित करून प्रत्यक्षात साकारत आहे. आशिया खंडातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या व महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाससाठी शासनाने म्हाडाची ( MHADA ) सुकाणू अभिकरण, म्हणून नियुक्ती केली आहे, असेही मंत्री आव्हाड यांनी सांगितले.

टप्प्या टप्प्याने केला जाणार पुनर्विकास

पुनर्विकासाचा पहिला टप्पा नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याप प्लॉट बमधील 23 चाळींचा पुनर्विकास करण्यात येत असून उर्वरित प्लॉट अमधील 19 चाळींचा पुनर्विकास दुसऱ्या टप्प्यामध्ये केला जाणार आहे. नायगाव बीडीडी चाळीतील पुनर्विकासाचा टप्पा क्रमांक 1 अंतर्गत प्लॉट बमधील 23 चाळींपैकी चाळ क्रमांक 5 बी, 8 बी व 22 बी मधील 175 गाळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालय विभागास सेवानिवासस्थान म्हणून देण्यात आले होते. या सेवानिवासस्थान गाळ्यांमधील रहिवाशांना नायगांव येथील बॉम्बे डाईंग या संक्रमण शिबिरामधील 225 चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या गाळ्यांचा ताबा म्हाडातर्फे देण्यात आला आहे.

लाभार्थ्याची अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयाने येथील 175 कर्मचाऱ्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करून चाळ 5 बी, 8 बी व 22 बी रिक्त करून दिली आहे. निष्कासित रिक्त इमारती पाहून त्या ठिकाणी विक्रीयोग्य सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे.

तीन हजार रहिवाशांची नायगाव बीडीडी चाळ

नायगाव बीडीडी चाळीमध्ये तळ अधिक 3 मजल्यांच्या 42 चाळी अस्तित्वात असून त्यामध्ये एकूण 3 हजार 344 रहिवासी वास्तव्यास आहेत. या प्रकल्पासाठी वास्तूशास्त्रज्ञ सल्लागार व प्रकल्पाचे समंत्रक म्हणून मे. संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्स यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रकल्पाचे कंत्राटदार म्हणून मे. एल. अॅण्ड.टी. कन्स्ट्रक्शन कंपनी लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पातील प्लॉट ब मधील सर्वेक्षणास स्थानिक रहिवाशांच्या एका गटाच्या विरोधामुळे सर्वेक्षण होऊ शकले नाही. प्लॉट अमधील चाळ क्रमांक 1 अ, 2 अ, 14 अ, 18 अ, 19 अ या 5 चाळीतील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले असून लाभार्थ्याची अंतिम पात्रता यादी ( 325 पात्र ) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा - मुंबईत गेल्या महिनाभरात ३,५१६ मुलांना कोरोना, एकाही मुलाचा कोविडने मृत्यू नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.