मुंबई - अनिल देशमुख यांच्या घरावर आज ईडीने कारवाई केली. त्यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत, असा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आज केला आहे. असे ट्विट सुद्धा अतुल भातखळकर यांनी केले आहे.
'खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसले आहेत'
अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये मंत्री अनिल परब आणि माजी मंत्री अनिल देशमुख हे दोघेही केवळ प्यादे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात, आज ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादे आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसले आहेत. सिल्व्हर ओक हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्याचे नाव आहे. तर वर्षा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बंगल्याचे नाव आहे. त्यामुळे भातखळकर यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरच आरोप केले आहेत.
अनिल देशमुखांच्या नागपूर, वरळीच्या घराव ईडीचा छापा
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून नागपूर आणि वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु आहे. ११ मे रोजी ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरू आहे.
हेही वाचा - ट्विटरकडून रवीशंकर प्रसाद यांचे अकाउंट तात्पुरते बंद; केंद्रीय मंत्र्यांनी 'हा' केला आरोप