ETV Bharat / city

राज्यातील हजारो शिक्षकांचा वरिष्ठ व निवडश्रेणीचा प्रश्न सुटला; तरीही आंदोलन करणारच!

वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र असूनही राज्यातील काही शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वेतनश्रेणी मिळत नव्हती. याविरोधात भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी ५ सप्टेंबर रोजी पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

teachers protest
तरीही आंदोलन करणारच
author img

By

Published : Aug 27, 2021, 5:21 PM IST

मुंबई - वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण आयोजित न केल्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा आर्थिक फटका आहे. त्यामुळे तातडीने प्रशिक्षण आयोजित न केल्यास ५ सप्टेंबर शिक्षक दिनाला आंदोलन करण्याचा इशारा भाजपा शिक्षक आघाडीकडून देण्यात आला होता. मात्र, यांची दखल घेत शिक्षण विभागाने वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण सुरू करण्याबाबत तयारी सुरू झाली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला पाठवले पत्र
वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र असूनही राज्यातील काही शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वेतनश्रेणी मिळत नव्हती. याविरोधात भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी ५ सप्टेंबर रोजी पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत बोरनारे यांनी १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड तसेच विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांना निवेदन दिले होते. शुक्रवारी याबाबत अनिल बोरनारे यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम डी सिंह यांनी पत्र पाठवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच या पत्रात शासनाकडून प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी करण्यात येत असल्याचेही म्हटले आहे.

काय म्हटले आहे पत्रात
वरिष्ठ निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाईन / ऑफलाईन अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अशी चार स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी उद्दिष्टे, विषयांची व घटकांची निश्चिती, वेळापत्रक तयार करणे, घटकांचे सादरीकरण करणे व त्याला अंतिम स्वरुप देण्याचे कामकाज सुरु आहे. कोरोना परिस्थितीत ऑनलाईन १० दिवसांच्या प्रशिक्षण आयोजनाची पूर्वतयारी परिषद स्तरावर सुरु करण्यात येत आहे असेही पत्रात म्हटले आहे.

आंदोलन करणारच
शिक्षणक्षेत्रातील केवळ एक प्रश्न सुटला असून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, शिक्षणक्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागली असून यामुळे राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक व पालक सर्वच भरडले जात असून याविरोधात आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

हेही वाचा - विषाणू येत असताना वातावरण प्रदूषित होणार नाही, यासाठी काम करू - आदित्य ठाकरेंचा राणेंना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.