मुंबई - काल दिवसभरात दोनदा मुकेश अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि रिलायन्स उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने अटक केली. ( Person Who Threatened To kill Mukesh Ambani Family Was Arrested ) त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांची टीम आरोपीला मुंबईकडे घेऊन येत असल्याची माहिती : रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे दोन वेळा फोन आल्याने खळबळ उडाली (Bomb threat to Reliance Foundation Hospital) होती. याप्रकरणी डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि बिहार पोलिसांच्या मदतीने बिहार मधील दरभंगा येथून आरोपीला मध्यरात्री ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी दिली. तर मुंबई पोलिसांची टीम आरोपीला मुंबईकडे घेऊन येत असल्याची माहिती देखील मुंबई पोलिसांनी दिली आहे.
1257 क्रमांकावर फोन करून धमकी : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारमधील दरभंगा येथून अटक करण्यात आली आहे. त्याला दरभंगा येथील ब्रह्मपुरीच्या मणिगाची येथून अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या 1257 क्रमांकावर फोन करून त्यांनी अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच रुग्णालय उडवून देण्याची धमकी दिली.
मुकेश अंबानींना धमकावल्याप्रकरणी दरभंगा येथून अटक : ब्रह्मपुरा, दरभंगा येथील मणिगाची येथून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव राकेश कुमार मिश्रा आहे. त्याच्याकडून मोबाईलही जप्त करण्यात आले असून त्यावरून त्याने रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाईन क्रमांकावर कॉल केला होता. आरोपीच्या अटकेची पुष्टी करताना दरभंगाचे एसएसपी आकाश कुमार म्हणाले की, मुंबई पोलिसांनी आरोपी राकेश मिश्रा याला अटक केली आहे आणि त्याला मुंबईला नेले आहे. जिथे त्याची चौकशी केली जाईल.
काय आहे प्रकरण?: सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलला बुधवारी एका अज्ञात क्रमांकावरून हा धमकीचा फोन आला. कॉलरने रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी आणि मुले आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना फोन केला. जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला फोन करणाऱ्याने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही दिली.
यापूर्वीही धमकीचे कॉल आले आहेत: याच वर्षी १५ ऑगस्ट रोजी रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला असाच कॉल करण्यात आला होता. त्याच वेळी, गेल्या वर्षी मुकेश अंबानींच्या मुंबईतील 'अँटिलिया' या घराबाहेर 20 स्फोटक जिलेटिनच्या काठ्या आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ सेडान सापडली होती. अँटिलियाच्या सुरक्षा पथकाने संशयित स्कॉर्पिओची माहिती पोलिसांना दिली. बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी तपासासाठी पोहोचले. फेब्रुवारी 2021 मध्ये, अंबानींच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थान 'अँटिलिया' जवळ स्फोटकांनी भरलेले स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) सापडले होते. त्यानंतर या घटनेप्रकरणी तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली होती.
निवासस्थानही उडवून देण्याची दिली धमकी : काल डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन काल दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी आला होता. त्यामध्ये रिलायन्स रुग्णालय उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबीयांनाही धमकी देण्यात आली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी रिलायन्स हॉस्पिटलला धमकीचा फोन (Reliance Foundation Hospital Threat) आला. या फोनवरून रिलायन्स हॉस्पिटल आणि अँटिलीया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
दुसऱ्यांदा धमकीचा फोन : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी १२.५७ वाजण्याच्या सुमारास परिमंडळ २ अंतर्गत डीबी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल प्राप्त झाला होता. या धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिलेली होती. त्याचप्रमाणे सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी आलेल्या धमकीच्या कॉलमध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात (death threats threats to Mukesh Ambani family) आली होती. तसेच त्यांचे निवासस्थान असलेले अँटिलिया ही इमारत देखील उडवून देण्यात येईल धमकी देण्यात आली. हे प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आणि आरोपीला बिहारमधून अटक केली आहे.