मुंबई - मुंबईत दहीहंडी आणि गणेशोत्सव हे दोन सण धुमधडाक्यात साजरे केले जातात. मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाल्याने गेले २ वर्षे सर्वसण निर्बधांमध्ये साजरे झाले. या वर्षी कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने पुन्हा सण धुमधडाक्यात साजरे केले जाणार आहेत. त्यासाठी मंडळे आणि कार्यकर्ते सजावटीच्या कामाला लागले आहेत. गेल्या दोन वर्षात घरगुती गणेश मूर्ती २ फुटाची तर सार्वजनिक गणेश मूर्ती ४ फूट उंचीची असावी असा नियम होता. The number of Ganesha idols decreased in Mumbai आता मुर्त्यांच्या उंचीवरील निर्बंध हटवण्यात आल्याने २० फुटाहून उंच मुर्त्यांची मुंबईमधील काही मंडळांकडून स्थापना केली जाणार आहे. कोरोना याआधी ज्या प्रमाणे मंडळांकडून जनजागृती केली जायची. त्याचप्रमाणे यंदाही सुरेख असे देखावे केले जात आहेत. मुंबईमध्ये १२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. दरवर्षी दीड ते दोन लाख सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींची स्थापना केली जाते.
गणेशमूर्तींची संख्या झाली कमी मुंबईमध्ये ११ दिवस गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. उत्सवासाठी दीड, पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणेश मुर्त्यांची स्थापना करण्यात येते. मुंबईत २०१५ मध्ये १ लाख ९२ हजार ३०८ गणेश मुर्त्यांची स्थापना करण्यात आली होती. २०१६ ते २०१८ या ३ वर्षात त्यात वाढ झाली. २०१६ मध्ये २ लाख १० हजार ११८, २०१७ मध्ये २ लाख ०२ हजार ३५२, २०१८ मध्ये २ लाख ३५ हजार ३७३ गणेश मुर्त्यांची स्थापना करण्यात आली होती. २०१९ मध्ये त्यात घट झाली. २०१९ मध्ये १ लाख ९६ हजर ४८३ मुर्त्यांची स्थापन करण्यात आली होती. २०२० मध्ये त्यात आणखी घट होऊन १ लाख ३५ हजार ५१५ मुर्त्यांची स्थापन करण्यात आली आहे. २०२१ मध्ये त्यात किंचीत वाढ होऊन १ लाख ६४ हजार ७६१ मुर्त्यांची स्थापना करण्यात आली. मुंबईमध्ये २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार असल्याने मुर्त्यांची स्थापना कमी झाल्याची माहिती गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे.
यामुळे संख्या कमी मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारामुळे तसेच पुनर्विकासाची कामे सुरु असल्याने अनेक ठिकाणी उत्सव साजरा केला गेला नाही. पालिकेने केलेल्या आवाहनानुसार काही ठिकाणी सोसायटीच्या आवारातच गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले यामुळे गणेश मुर्त्यांची संख्या कमी झाल्याचे दिसत असल्याची माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली.
विसराजनासाठी पालिकेकडून सुविधा मुंबईमध्ये दरवर्षी दीड ते दोन लाख गणेश मुर्त्यांची स्थापना करण्यात येते. या मुर्त्यांचे विसर्जन करता यावे यासाठी पालिकेने ७४ नैसर्गिक स्थळी उपायोजना केली आहे. त्याचप्रमाणे लहान मुर्त्यांचे विसर्जन करता यावे यासाठी १६० कृत्रिम तलाव उभारले जात आहेत, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त व गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली.
हेही वाचा - Sonali Phogat Murder Case सोनाली फोगट खून प्रकरणी आणखी दोघांना अटक, ड्रगचा झाला खुलासा