ETV Bharat / city

मुंबई महापालिकेत १४९ वर्षांत ६४ चे 'असे' झाले २३६ नगरसेवक

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहरातील १ कोटी ३० लाख नागरिकांना सोयी सुविधा पुरवणाऱ्या मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १८७२ मध्ये मुंबई महापालिकेत ६२ नगरसेवक होते. त्यात गेल्या १४९ वर्षात ५ वेळा वाढ करण्यात आली आहे. आज राज्य सरकारने २२७ नगरसेवकांच्या संख्येत ९ ने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार आहे.

BMC
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Nov 10, 2021, 10:15 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहरातील १ कोटी ३० लाख नागरिकांना सोयी सुविधा पुरवणाऱ्या मुंबई महापालिकेच्या (BMC) नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १८७२ मध्ये मुंबई महापालिकेत ६२ नगरसेवक होते. त्यात गेल्या १४९ वर्षात ५ वेळा वाढ करण्यात आली आहे. आज राज्य सरकारने २२७ नगरसेवकांच्या संख्येत ९ ने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार आहे.

१८७२ ते १९८२ -

मुंबई महापालिकेची स्थापना झाली त्यावेळी म्हणजे १८७२ मध्ये नगरसेवकांची संख्या ६४ होती. १९६३ ला एक सदस्य प्रभाग रचना अंमलात आली यामुळे नगरसेवकांची संख्या ७६ ने वाढून ती संख्या १४० वर गेली. १९८२ मध्ये १९ वर्षांनी वार्ड व नगरसेवक संख्येत मोठा बदल झाला. त्यावेळी अस्तित्वात असलेली वार्ड, नगरसेवक संख्या आणखीन ३० ने वाढविण्यात येऊन ती थेट १७० वर गेली. तसेच, १९८३ च्या सुमारास नगरसेवकांचा निवृत्तीचा कालावधी १ वर्षाने वाढविण्यात आला होता.

१९९१ ते २०२१ -

१९८२ नंतर ९ वर्षांनी म्हणजेच १९९१ च्या सुमारास पालिकेतील वार्ड व नगरसेवकांच्या संख्येत थेट ५१ ने वाढ करण्यात आली. त्यामुळे नगरसेवकांची संख्या २२१ वर पोहोचली. तर २००२ ला वार्ड व नगरसेवकांची संख्या ६ ने वाढवण्यात आली यामुळे नगरसेवकांची संख्या २२७ झाली. आता २०२१ मध्ये त्यात पुन्हा ९ नगरसेवकांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे नगरसेवकांची संख्या २३६ इतकी झाली आहे.

५ नामनिर्देशित नगरसेवक -

मुंबईतील नगरसेवकांची व वॉर्डांची संख्या २२७ वरून २३६ करण्यात आली आहे. पालिकेत ५ नामनिर्देशित नगरसेवक सुद्धा आहेत. त्यामुळे सध्या २२७ नगरसेवक अधिक ५ नामनिर्देशित नगरसेवक, असे एकूण २३२ नगरसेवक आहेत. सरकारने ९ नगरसेवकांची संख्या वाढवल्याने नगरसेवकांची संख्या २३६ झाली आहे. यात ५ नामनिर्देशित नगरसेवक यांचाही समावेश होणार असल्याने मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २४१ वर पोहोचणार आहे.

हे ही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात 1976 रुग्णांना डिस्चार्ज, 1094 नवे रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.