ETV Bharat / city

Murder investigation : रिक्षावरील वेडिंग जाहिरातीच्या बॅनरमुळे सुरक्षा रक्षकाच्या हत्येचा ८ तासात लागला छडा - CCTV

ठाणे : डोंबिवली एमआयडीसीतील ( Dombivali MIDC ) एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची १५ जून रोजीच्या मध्यरात्री भंगार चोरट्यांनी निर्घृण हत्या ( Brutal murder ) केली होती. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही ( CCTV ) फुटेजमध्ये कंपनी बाहेर रस्त्यावर एका रिक्षेच्या पाठीमागे वेडिंग जाहिरातीचा बॅनर होता. याच रिक्षावरील बॅनरमुळे पोलिसांनी ८ तासातच हत्येचा छडा लावून आरोपी रिक्षाचालकासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. तर फरार दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. टोनो डिसिल्व्हा उर्फ शिवा सोमा हिलम (रा. सूचकनाका, कल्याण पूर्व) फिरोज इस्माईल खान ( वय ३०, कोळसेवाडी, कल्याण ) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर ग्यानबहादुर गुरूम (६४) असे हत्या झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

Murder investigation
Murder investigation
author img

By

Published : Jun 18, 2022, 3:17 PM IST

ठाणे : डोंबिवली एमआयडीसीतील ( Dombivali MIDC ) एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची १५ जून रोजीच्या मध्यरात्री भंगार चोरट्यांनी निर्घृण हत्या ( Brutal murder ) केली होती. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही ( CCTV ) फुटेजमध्ये कंपनी बाहेर रस्त्यावर एका रिक्षेच्या पाठीमागे वेडिंग जाहिरातीचा बॅनर होता. याच रिक्षावरील बॅनरमुळे पोलिसांनी ८ तासातच हत्येचा छडा लावून आरोपी रिक्षाचालकासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. तर फरार दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. टोनो डिसिल्व्हा उर्फ शिवा सोमा हिलम (रा. सूचकनाका, कल्याण पूर्व) फिरोज इस्माईल खान ( वय ३०, कोळसेवाडी, कल्याण ) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर ग्यानबहादूर गुरूम (६४) असे हत्या झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीचा माग - डोंबिवली एमआयडीसीतील विजय पेपर प्राॅडक्ट या बंद कंपनीमध्ये मृत ग्यानबहादूर हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे १५ जून रोजी रात्रपाळी करत असताना कंपनीत चोरीच्या उद्देशाने चोरटे घुसले होते. हे चोरटे चोरी करत असतानाच त्यांना कडवा प्रतिकार केल्याने कंपनी आवारात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात हत्येचा गुन्हा केला. त्यानंतर पोलीस पथकाने तपासात सुरू केला असता कंपनी भागातील सीसीटीव्ही फुटजे तपासणी करून ताब्यात घेतले. यामधील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना कंपनीजवळ मध्यरात्रीच्या वेळेत तीन जण रिक्षेतून आलेले दिसतात. या रिक्षेच्या पाठीमागे एबीपी माझा परिवाराकडून एबीपी वेडिंगच्या जाहिरातीचे बॅनर रिक्षाला लावला होता.

बॅनरवरून रिक्षाचालकाचा शोध घेऊन केली अटक - एबीपी वेडिंगच्या जाहिरातीचा बॅनर असलेल्या रिक्षाचा शोध पोलिसांनी कल्याण, डोंबिवली भागातून घेतला. एका रिक्षेचा मागे तो बॅनर असलेला भाग कापला असल्याचे दिसले. पोलिसांना त्या रिक्षा चालकावर संशय आला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले असता रिक्षा चालकाने आपले नाव टोनो डिसिल्व्हा उर्फ शिवा सोमा हिलम असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची हत्या तीन साथीदारांच्या साहाय्याने केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून चोरीचे भांगर विकत घेणाऱ्या फिरोज इस्माईल खान यालाही अटक केली.

लोखंडी रॉड डोक्यात मारून केली हत्या - घटनेच्या दिवशी तीन जण रिक्षेतून विजय कंपनीत भंगार चोरीच्या उद्देशाने आले होते. कंपनीची भिंतीवरून उडी मारून त्यांनी कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर कंपनी कार्यालयाचा दरवाजा तोडत असताना सुरक्षा रक्षक ग्यानबहादूर यांना जाग आली. त्यांनी चोर म्हणून मोठ्याने ओरडा केला. या ओरड्याने आपण पकडले जाऊ या भीतीने तिघांनी लोखंडी रॉड ग्यानबहादूर यांच्या डोक्यात मारला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही भंगार चोरांनी सुरक्षा रक्षकाजवळील कार्यालयाच्या चाव्या काढून घेतल्या. कार्यालय उघडून त्यामधील कासा, तांबे, पितळ धातुचे भंगार साहित्य, धातुची रिळे, ग्यानबहादूरचा मोबाईल असा एकूण दीड लाखाचा ऐवज चोरून नेला.

चोरीचे भांगर विकत घेणाऱ्यालाही अटक - सुरक्षा रक्षकाची हत्या करून चोरीचे महागडे भंगार चोरट्यांनी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीतील भंगार विक्रेता फिरोज खान याला १० हजार रूपयांना विकले. आलेले पैसे चोघांनी वाटून घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र हत्येप्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे अटक असलेला रिक्षाचालक टोनो डिसिल्व्हा उर्फ शिवा सोमा हिलम हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चार गुन्हे यापूर्वी दाखल असल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली आहे.

हेही वाचा - Legislative Council elections : शिवसेना आमदारांची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.