ETV Bharat / city

मेट्रो 3 प्रकल्पात आता 'मियावाकी' पद्धतीने करण्यात येणार 9000 झाडांचे रोपण

author img

By

Published : Feb 24, 2021, 7:17 PM IST

आता मेट्रो 3 प्रकल्पात 9000 झाडांचे रोपण मियावाकी पद्धतीने केले जाणार असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने जाहीर केले आहे. गोरेगाव येथील इनॉर्बिट मॉलजवळ ही झाडे लावली जाणार आहेत.

mumbai Metro
mumbai Metro

मुंबई - झाडांच्या रोपणासाठी तसेच जंगल तयार करण्यासाठी मियावाकी या जपानी पद्धतीचा वापर आता देशात, मुंबईत केला जात आहे. तर आता यात मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) प्रकल्पातही मियावाकीचे प्रयोग पाहायला मिळणार आहेत. कारण आता मेट्रो 3 प्रकल्पात 9000 झाडांचे रोपण मियावाकी पद्धतीने केले जाणार असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने जाहीर केले आहे. गोरेगाव येथील इनॉर्बिट मॉलजवळ ही झाडे लावली जाणार आहेत.

तीन महिन्यांत लावणार झाडे

मुंबई महानगर पालिकेकडून मुंबईभर मियावाकी उद्यान तयार केली जात आहेत. तर आता एमएमआरसीही मियावाकीकडे वळली आहे. मेट्रो 3 प्रकल्पात मोठ्या संख्येने झाडांची कत्तल करण्यात आली आहे, पुढे ही करण्यात येणार आहे. याच मुद्द्यावरून पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी कत्तल करण्यात आलेल्या झाडांच्या मोबादल्यात मोठ्या संख्येने इतर ठिकाणी झाडे लावण्याचे जाहीर करत एमएमओपीएकडून वृक्षारोपण करण्यात येत आहे. पण या वृक्षारोपणावर आणि प्रकल्पातील पुनर्रोपित करण्यात आलेल्या झाडांबाबतही वाद आहे. अशात आता एमएमआरसीने मियावाकीची संकल्पना पुढे आणली आहे. फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (एफडीसीएम)च्या मदतीने एमएमआरसी 9000 झाडांचे मियावाकी पद्धतीने रोपण पुढील तीन महिन्यांत करणार असल्याची माहिती रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, एमएमआरसी यांनी दिली आहे.

'या' झाडांचा समावेश

इनॉर्बिट मॉलजवळ 3000 चौ. मीटर जागेवर 9000 झाडे मियावाकी पद्धतीने लावली जाणार आहेत. यासाठी नुकताच एफडीसीएमशी करार करण्यात आला आहे. या करारानुसार 9000 झाडांमध्ये काथ, कडुलिंब, आवळा, बकुळ, सिताअशोक, चिंच, अर्जुन, बदाम अशा झाडांचा यात समावेश असणार आहे. तर एफडीसीएमकडून दोन वर्षे या झाडांची देखभाल आणि मशागत करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.