ETV Bharat / city

मोनोरेल प्रकल्पात आता सीएफएलऐवजी एलईडी दिवे.. 2 कोटी 92 लाखांचा खर्च - मुंबई मोनोरेल प्रोजेक्ट

चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्पातील प्रकाश रचना (लाईट) बदलण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने घेतला आहे. मोनोरेल डेपो आणि मोनो मार्गातील सर्व स्थानकावरील सीएफएल लाईट बदलत त्या जागी एलईडी लाईट लावण्यात येणार आहे.

monorail project now has LED lights
monorail project now has LED lights
author img

By

Published : May 25, 2021, 4:49 PM IST

मुंबई - चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्पातील प्रकाश रचना (लाईट) बदलण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने घेतला आहे. मोनोरेल डेपो आणि मोनो मार्गातील सर्व स्थानकावरील सीएफएल लाईट बदलत त्या जागी एलईडी लाईट लावण्यात येणार आहे. या कामासाठी आज एमएमआरडीएने निविदा मागवली आहे. या निविदेनुसार कंत्राटदाराची नियुक्ती करत हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. तर यासाठी एमएमआरडीएकडून 2 कोटी 92 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

डेपो आणि स्थानकातील लाईट बदलणार -

20 किमीची चेंबूर ते जेकब सर्कल अशी देशातील एकमेव मोनोरेल आहे. मोनोरेलला प्रवासी संख्या नसल्याने तोट्यात हा प्रकल्प चालवला जात आहे. अशात आता एमएमआरडीएने मोनोरेल डेपो आणि सर्व मोनो स्थानकातील प्रकाश रचना अर्थात लाईटस फिटिंग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सद्या डेपो आणि मोनो स्थानकात सीएफएल लाइटस आहेत. मात्र या प्रकारच्या लाईटसऐवजी एलईडी लाइट्स अधिक परिणामकारक आहेत असे म्हणत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या कामासाठी आज एमएमआरडीएने कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा काढली आहे.

सहा महिन्यात करणार काम पूर्ण -

मोनो डेपो आणि मोनो स्थानकार एलईडी लाइट्स बसवण्यासाठीची निविदा लवकरात लवकर अंतिम करत कंत्राटदराची नियुक्ती करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. तर कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर त्याने कामाला सुरुवात केल्यापासून पुढील सहा महिन्यात हे काम पूर्ण करून घेण्यात येणार आहे. तर या नवीन एलईडी लाइट्स आधीच्या लाइट्स पेक्षा अधिक फायद्याच्या ठरतील असे एमएमआरडीएकडून स्पष्ट केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.