ETV Bharat / city

होळीनिमित्त मुंबईकरांना दिलासा, रविवारी 'असे' असणार लोकलच्या मेगाब्लॉकचे नियोजन

author img

By

Published : Mar 26, 2021, 9:42 PM IST

होळीच्या सणानिमित्त मुंबईकरांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिल रेल्वे मार्गावर रविवारी दिवसा कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. फक्त हार्बर मार्गावर रविवारी सकाळी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नाही
पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नाही

मुंबई - होळीच्या सणानिमित्त मुंबईकरांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिल रेल्वे मार्गावर रविवारी दिवसा कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. फक्त हार्बर मार्गावर रविवारी सकाळी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर 28 मार्च रोजी रेल्वे रुळाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक पनवेल ते वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11 वाजून 5 मिनिटांपासून ते संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांपर्यंत असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्व लोकल सेवा सकाळी 10 वाजून 49 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 1 मिनिटापर्यंत रद्द असणार आहेत. या मेगाब्लॉक दरम्यान ठाणे ते वाशी - नेरूळ स्थानकादरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील. तर सीएसएमटी ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी बोरिवली ते भायंदर रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी रात्री 12 पासून ते रात्री 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत काही अप व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा वसई ते गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर रविवारी दिवसभर पश्चिम रेल्वेकडून कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक घेतला जाणार नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा - रश्मी शुक्ला अडचणीत; दिशाभूल करून 'फोन टॅपिंग' केल्याचा शासनाचा ठपका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.