मुंबई - सायन घाटकोपर मार्गावरील चुनाभट्टी ते बिकेसीकडे जाणाऱ्या उड्डाणपूलावर आज अचानक पहाटेच्या सुमारास लोखंडी कमान पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. चुनाभट्टी ते बिकेसी जोड उड्डाणपुलावर आज अचानक पाहाटे साडेपाचच्या दरम्यान लोखंडी कमान कोसळली. अज्ञात वाहानाने कमानीला धडक दिल्याने ही कमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे.
एमएमआरडीएकडून हटवण्यात आली कमान
दरम्यान ही लोखंडी कमान रस्त्यावर पडल्याने, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. स्थानिक नगरसेवकांनी याबाबत एमएमआरडीएला माहिती दिली. माहिती मिळताच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, ही लोखंडी कमान क्रेनच्या साहाय्याने बाजूला केली, व पुन्हा वाहतूक सुरूळीत झाली. दरम्यान या घटनेमध्ये कुठलीही जिवीतहाणी झाली नाही.