पणजी - विधानसभा निवडणुकीत भाजपला 20 जागा मिळाल्या असून मगोप आणि तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्याने भाजपचे संख्याबळ 25 झाले आहे. त्यामुळे भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. (Goa Assembly Election 2022) गुरुवारी (दि. 10 मार्च)रोजी रात्री दिल्लीत उशिरा केंद्रीय संसदीय समितीची बैठक होऊन गोव्यासाठी विशेष निरीक्षकाची निवड करण्यात आली आहे. ते आज गोव्यात येत असून त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक होईल. त्यात गटनेते पदाची निवड केली जाईल.
डॉ. प्रमोद सावंत विधिमंडळाचे नेते
या बैठकीनंतर ते राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठीचा दावा करतील अशी माहिती गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Pramod Sawant Legislative Group Leader) दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातल्या निवडणूक डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढवली असल्याने तेच विधिमंडळ पक्षाचे नेते असतील त्यांच्या निवडीचा सोपस्कर आहे. तो पूर्ण केला जाणार आहे. भाजपच्या विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी सत्तास्थापनेची माहिती दिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सी. टी रवी, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
आम्हाला बहुमत मिळाल्यामुळे धावपळ करण्याची गरज नाही
फडणवीस म्हणाले, 10 वर्षांनंतर गोव्यातील जनतेने भाजपला पुन्हा स्पष्ट बहुमत दिले आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारचे यश आहे. आम्हाला बहुमत मिळाले तरीही आम्ही मगोप आणि इतरांची मदतीने सरकार बनवणार आहोत. आम्हाला बहुमत मिळाल्यामुळे धावपळ करण्याची गरज नाही. काँग्रेसने कालच राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, काँग्रेसचे कुणीही आज राज्यपालांच्या भेटीला जाऊ शकले नाही टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा - Goa Election Result 2022 : दोन दिवसात गोव्यामध्ये सरकारचा शपथविधी पार पाडणार : देवेंद्र फडणवीस