नाशिक - गणेशाेत्सव मंडळांना एकाच खिडकीतून सर्व परवानगी द्या, परवानगी देताना अडचणी निर्माण करू नका, अन्यथा गणपती बिठाओ आंदोलन करुन गणपती १० दिवस झाकून ठेवण्याचा इशारा नाशिकच्या सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांनी प्रशासनाला दिली आहे. तर, यासंदर्भात गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
गणपती १० दिवस झाकून ठेवण्याचा इशारा - यंदाच्या गणेशोत्सवात डीजे वाजवणारच असे स्पष्ट केले आहे. विसर्जन मिरवणूकीला दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी मिळण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि डीजेच्या दणदणाटात होणार आहे. याबाबत नाशिक गणेश मंडळाची बैठक पार पडली. यंदाच्या गणेशोत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे. गणेशोत्सव साजरा जल्लोषात करण्यासाठी एकाच खिडकीतून सर्व परवानगी द्या, परवानगी देताना अडचणी निर्माण करू नका अन्यथा गणपती बिठाओ आंदोलन करणार असा ईशारा देण्यात आला आहे.
गणेश मंडळाने तयारी सुरू केली - गणेशोत्सव साजरा जल्लोषात करण्यासाठी परवानगीच्या नावाखाली पालिकेसह पोलिसांनी मंडळाची अडवणूक केली जावू नये अशी एकमुखी मागणी गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत करण्यात आली. शहरातील मुख्य ठिकाणी गणेश मूर्ती केंद्रही थाटले आहेत. तर ढोल पथकांची जय्यत तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने प्रत्येक गणेश मंडळाने तयारी सुरू केली आहे. मात्र, पालिका, पोलीस, वाहतूक, महावितरण अशा विविध परवानगीसाठी पदाधिकाऱ्यांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात ते यंदा सहन करणार नाही, असा इशारा यावेळी मंडळाच्या बैठकीत देण्यात आला आहे.
हेही वाचा - 'कोश्यारींनी पुन्हा आपल्या बुद्धिमत्तेची कुवत...'; राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यावरुन मनसेचा हल्लाबोल