मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः मैदानात उतरले आहेत. आज शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील सर्व वार्ड अध्यक्ष यांची बैठक घेतली. या बैठकीत मुंबईतील 236 वार्डचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना किंवा काँग्रेस सोबत आघाडी होईल का नाही? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिंता करू नये.
सर्व कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागावे अशा. सूचना बैठकीतून शरद पवार यांनी दिल्याची माहिती मिळतेय. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र नवाब मलिक हे तुरुंगात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनीच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सूत्रे हातात घेतल्याचे सांगितले जात आहे
हेही वाचा : Shiv Sena: शिवसेनेसाठी कसोटीचा काळ! रोजची गळती कधी थांबणार? वाचा, सविस्तर.