मुंबई - आज जेईई परीक्षेचा निकाल जाहीर ( JEE Advanced 2022 Result Declare ) झाला. बॉम्बे झोनच्या आर के शिशिरने आयआयटी प्रवेश परीक्षेत जेईई अॅडव्हान्स्डमध्ये अव्वल क्रमांक पटकावला ( R K Shishir rank first ) आहे. निकाल आज रविवारी जाहीर करण्यात आला.
मुंबईचे पाच विद्यार्थी टॉपमध्ये - इंजीनियरिंगच्या संदर्भात जे ई ई परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर या परीक्षेमध्ये आय आयटी मुंबईचे पाच विद्यार्थी टॉपमध्ये आलेले आहेत. देशभरात लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण होण्याची तयारी केली. मात्र कठोर मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले आहे. यामधून आयआयटी मुंबईचे पाच विद्यार्थी टॉपमध्ये आले आहेत. प्रतीक साहू हा दुसरा, माहित गढीवाला हा तिसरा तर विशाल बिसानी आणि पाचवा विद्यार्थी अरीहंत वशिष्ठ असे एकूण पाचही विद्यार्थी आय आय टी मुंबईचे टॉपर यादीत झळकले आहे.
आर के शिशिरने प्रथम - आयआयटी बॉम्बेने दिलेल्या माहितीनुसार, शिशिरने 360 पैकी 314 गुण मिळवले आहेत. तर दिल्ली विभागातील तनिष्का काबरा हिने 277 गुणांसह महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावले ( Tanishka Kabra tops in the women list ) आहे. तिची ऑल इंडिया रँक 16 आहे. 1.5 लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसले होते. यात 40,000 हून अधिक उमेदवार पात्र ठरले आहेत. याबाबत आर के शिरीरसोबत ईटीव्हीने बातचीत केली असता , "घरात आणि माझे शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.मी वर्षभर अभ्यासाचे नियोजन केले होते. त्यामुळे ताण जाणवला नाही. असे त्याने सांगितले.
तनिष्का काबरा महिलांमध्ये अव्वल - यात एकूण गुण गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात मिळालेल्या गुणांची बेरीज करून मोजले जातात. उमेदवारांना रँक लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी एकूण पात्रता गुणांची पूर्तता करावी लागते. असे आयआयटी बॉम्बेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जेईई-मेन, जी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी प्रवेश परीक्षा आहे. त्यात ही जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्रता परीक्षा आहे.