मुंबई : आपल्या संविधानाने सर्वसामान्य जनतेला मोठी ताकद ( strength given by constitution ) दिली आहे. म्हणूनच संयुक्त किसान मोर्चातल्या शेतकऱ्यांचा लढा ( farmers' movement ) यशस्वी झाला आणि केंद्रसरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule) यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार ( Samajbhushan Award ) देऊन सन्मानित करण्यात आले.
'संविधान वाचलं तरच देश वाचेल'
सुप्रिया सुळे म्हणाल्या संविधान हे जात, धर्म, किंवा प्रांत नाही तो एक ग्रंथरूपातला कष्टपूर्वक घडवलेला मार्गदर्शक आहे. पण आता केंद्रातले सत्ताधारी हे संविधान बदलू पहात आहेत. त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्न याच दिशेने सुरू आहेत. आज आपली जी काही ओळख आहे ती संविधानामुळे आहे. त्यामुळे संविधानात जर कुणी बदल करत असेल तर त्याचा कडाडून विरोध करायला हवा. संविधान वाचलं तरच देश वाचेल. त्यामुळे आपण संपूर्ण राज्यभर संविधानाच्या संरक्षणासाठी उभं राहिलं पाहिजे. आम्ही जेव्हा अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशात जातो तेव्हा तिकडचे लोक आम्हाला आवर्जून बाबासाहेबांबद्दल विचारतात. मला तर वाटतं की भारताच्या बाहेर बाबासाहेब अधिक मोठे आहेत. मी अमेरिकेत गेले होते तेव्हा लक्षात आलं की ते जेवढं आपल्या आईवर प्रेम करतात तेवढंच संविधानावरही प्रेम करतात. त्यामुळेच या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेबांबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल परदेशातल्या लोकांना खूपच कुतुहल वाटतं, अशी आठवण खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी सांगितली. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक( Minority Minister Nawab Malik ) हे देखील उपस्थित होते.
हेही वाचा - Nawab Malik Allegations : मला अडकवण्याचे कारस्थान, गृहमंत्री शाहांकडे तक्रार करणार - मलिक