ETV Bharat / city

Dussehra Gathering: दसरा मेळावा कुणाचा? शिंदे गाटाचा, ठाकरे गटाचा की राज'गर्जना होणार; वाचा सविस्तर - राज ठाकरे बावनकुळे

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कवर लाखो शिवसैनिकांच्या उपस्थितीत केला जातो. पण, आता परिस्थिती पूर्वीसारखी नाही आता शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिवसेनेचे निम्म्याहून अधिक आमदार बंडखोर गटात आहेत. त्यामुळे येथे दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आपल्या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजी पार्कवर आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Dussehra Gathering दसरा मेळाव्याच्या उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे वादात आता मनसेने उडी घेतली आहे. मनसेनेच्या संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केल्याने दसरा मेळाव्याचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे
author img

By

Published : Aug 30, 2022, 10:52 PM IST

मुंबई - दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा भरतो. यावेळीही पार्टीने परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र, बीएमसी आणि पोलिसांनी अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नाही. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे गटानेही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचे सांगून हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे केले आहे. दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक येथे जमतात आणि येथून संदेश घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात जातात. मागील दोन वर्ष कोरोनामुळे येथे दसरा मेळावा होऊ शकला नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला येथे शक्तिप्रदर्शन करण्याची मोठी संधी असून, त्यासाठी पालिकेकडून परवानगी न मिळाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

ट्विट
ट्विट

मनसेची उडी - या दोघांचा वाद अद्याप थांबलेला नाही तोच दसरा मेळाव्याच्या या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. मनसेचे नेते व सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून "'शिवतीर्थ'वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे "वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो" असे देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सोबतच आपण राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना दसऱ्यानिमित्त शिवाजी पार्कवर सभा घेण्याची विनंती करणार असल्याचे देखील देशपांडे यांनी म्हटले आहे.

'दसरा मेळावा आमचाच' उद्धव ठाकरे - शिवाजी पार्कवरच्या या दसरा मेळाव्यावरून वाद सुरू असताना आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'आमचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होईल. मग परवानगी मिळो अथवा नाही' अशा थेट शब्दात ठणकावून सांगितल. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर जमण्यास शिवसैनिकांची थोड्याच दिवसात सुरुवात होईल. त्यामुळे हा जो काही तांत्रिक मांत्रिक भाग आहे तो ते बघून घेतील. पण, आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल."

मेळावा शिवतीर्थावरच बंधनकारक नाही - उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक पवित्र्यावरून शिंदे गटाची बाजू सावरण्यासाठी बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर पुढे सरसावले. पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया विचारले असता केसरकर म्हणाले की, "कस आहे दसरा मेळावा ही शेवटी शिवसेनेची परंपरा आहे. आता तो शिवतीर्थावरच व्हायला हवा असे काही नाही. यावरून महाराष्ट्रात कुठलेही मतभेद व्हावे असा आमचा हेतू नाही. पण यावेळी हा मेळावा एकनाथ शिंदेंनी घ्यावा की अन्य कोणी यावर मी बोलणं योग्य नाही यावर आमचे नेते एकनाथ शिंदेच योग्य वेळी बोलतील." अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ? दरम्यान, सध्याच्या एकूणच या परिस्थितीवरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या वादाचा फायदा आता मनसे घेताना दिसते. यात मराठीतील वाक्प्रचार दोघांचा भांडण तिसऱ्याचा लाभ याचा प्रत्यय इथे येईल. याआधी देखील राज ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक भाषणात सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे एक संधी म्हणून बघा आणि आलेल्या संधीचं सोनं करा अशा सूचना आपल्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी दिलेल्या आहेत. त्यामुळे या दोघांच्या भांडणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न सध्या मनसे दिसतेय.

हेही वाचा - मोठी बातमी: आमिर खान, तापसी पन्नू आणि करीना कपूर अडचणीत.. नोटीस जारी, 'असे' आहे संपूर्ण प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.