ETV Bharat / city

Mumbai Corona : महिनाभरात रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला, कालावधी २ हजार २०५ दिवसांवर

मुंबईमध्ये डिसेंबरपासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली. या लाटेदरम्यान रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली होती. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधी ३६ दिवसांवर आला होता. मात्र, आता रुग्णसंख्या कमी झाल्याने हा कालावधी महिनाभरात वाढून २ हजार २०५ दिवसांच्यावर गेला ( Mumbai Corona ) आहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

Mumbai Corona
Mumbai Corona
author img

By

Published : Feb 16, 2022, 10:43 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये डिसेंबरपासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली. या लाटेदरम्यान रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली होती. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधी ३६ दिवसांवर आला होता. मात्र, आता रुग्णसंख्या कमी झाल्याने हा कालावधी महिनाभरात वाढून २ हजार २०५ दिवसांच्यावर गेला ( Mumbai Corona ) आहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला - मुंबईमध्ये मार्च, २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या तीन लाटा आल्या असून त्या थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी १ डिसेंबरला मुंबईमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी २ हजार ७८० दिवस इतका होता. जानेवारीच्या ६ ते ८ तारखेला दिवसाला २० हजार रुग्णांची नोंद झाली. यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी घसरून ११ जानेवारीला ३६ दिवसांवर आला होता. कोरोना विषाणूचा प्रसार सध्या आटोक्यात असल्याने दिवसाला २०० ते ३०० रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून २ हजार २०५ दिवस इतका नोंदवण्यात आला आहे.

दादर येथे रुग्ण दुपटीचा कालावधी ४ हजार १३४ दिवस - मुंबईमध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण दुपटीचा कालावधी जी नॉर्थ दादर येथे ४ हजार १३४, घाटकोपर एन वॉर्ड येथे ४ हजार १५, दहिसर आर नॉर्थ येथे ३ हजार ९२१, बोरोवळी आर सेंट्रल ३ हजार ५८४, सँडहर्स्ट रोड बी वॉर्ड येथे ३ हजार ५७६, मुलुंड टी वॉर्ड येथे ३ हजार ३०७, कांदिवली आर साऊथ येथे ३ हजार ११६ इतका रुग्ण दुपटीचा कालावधी नोंद झाला आहे. तर सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी कुलाबा ए विभाग येथे १ हजार १०५, एम वेस्ट चेंबूर येथे १ हजार ६३६, बांद्रा एच वेस्ट येथे १ हजार ६९३, ग्रॅण्ट रोड डी विभाग येथे १ हजार ७०५, कुर्ला एल वॉर्ड येथे १ हजार ७२०, अंधेरी पश्चिम के वेस्ट विभागात १ हजार ७३९ तर अंधेरी पूर्व के ईस्ट येथे १ हजार ८३८ इतका रुग्ण दुपटीचा कालावधी नोंद झाला आहे.

दुसऱ्या लाटेत २७८० दिवस - मुंबईत फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. १ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ५६४ दिवस इतका होता. दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला १० ते ११ हजार रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या वाढू लागल्याने १ एप्रिलला रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ तर १८ एप्रिलला हा कालावधी ४५ दिवसांवर घसरून खाली आला. दुसरीला लाट आटोक्यात आल्यावर रुग्णसंख्या घटू लागल्यावर १ डिसेंबर २०२१ ला रुग्ण दुपटीचा कालावधी २७८० दिवस नोंदवला गेला होता.

कोरोना आटोक्यात - रुग्णसंख्या कमी झाल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढतो. रुग्णसंख्या वाढल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होतो. डिसमेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली. मुंबईकरांनी दिलेली साथ आणि नियमांचे केलेले पालन तसेच हर्ड हुमिनीती तयार झाल्याने महिनाभरातच तिसरी लाट आटोक्यात आली. सध्या दिवसाला २०० ते ३०० रुग्ण आढळून येत आहे. यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत आहे. हे पालिकेच्या केलेल्या प्रयत्नाना आलेले यश आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - Etv Bharat Special Report : लालपरीचे तिकीट देणाऱ्या दीडशे एजंटवर उपासमारी; हजारों छोट्या व्यावसायिकांना फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.