ETV Bharat / city

८वी ते १२वीनंतर अन्य वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग करणार ई-सर्वेक्षण

अन्य वर्ग सुरू करण्याबाबत पालक व शिक्षकांकडून विचारणा होत असल्याने शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात शाळा सुरू करण्याबाबत ई-सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे.

ई सर्वेक्षण
ई सर्वेक्षण
author img

By

Published : Jul 9, 2021, 9:07 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलै २०२१पासून सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहेत. त्याच धर्तीवर अन्य वर्ग सुरू करण्याबाबत पालक व शिक्षकांकडून विचारणा होत असल्याने शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात शाळा सुरू करण्याबाबत ई-सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे. हे सर्वेक्षण १२ जुलै रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यत पर्यंत सुरू राहणार आहे.

शालेय शिक्षण विभागाची मंजुरी

आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात १५ जून २०२१ आणि विदर्भात २८ जून २०२१पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले आहे. सध्या राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने वर्ग सुरू आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेतात कोविड-मुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याची मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील कोविड-मुक्त क्षेत्रात ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाने पालकांसोबत ठराव करून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे.

सर्वेक्षणासाठी सोमवारी रात्रीपर्यंतची मुदत

भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलै २०२१पासून सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याचसोबत अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरू करण्याबाबतदेखील वारंवार विचारणा करत आहेत. शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक, यांच्याकडून शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे. हे सर्वेक्षण सोमवार १२ जुलै २०२१ रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत सुरू राहील. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी यांनी पालकांना या सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन करावे.

असे होणार सर्वेक्षण

शाळा सुरू करण्यासंदर्भात पालकांचे मत जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून ई सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षणासाठी शिक्षण विभागाकडून http://www.maa.ac.in/survey ही लिंक उपलब्ध करून दिली आहे. पालकांच्या सर्वेक्षणात एकूण आठ प्रश्न देण्यात आले आहेत. प्रश्नामध्ये पालकांना जिल्हा, आपला परिसर, संपूर्ण पूर्ण नाव, मोबाइल क्रमांक, पाल्य कोणत्या वर्गात आहे, आणि कोविडशी संबंधित आवश्यक त्या सर्व सुरक्षा विषयक उपाययोजना करून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यास आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्याची आपली तयारी आहे काय, असे आठ प्रश्न देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.