मुंबई - स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीने घरोघरी तिरंगा हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे त्याची जोरदार तयारी सुरू असल्याने बाजारात झेंड्यांची मागणी प्रचंड वाढली आहे मात्र मुंबईत झेंडेविक्री करणाऱ्या छोट्या व्यासायिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे दरम्यान पक्षीय नेते स्थानिक नगरसेवक आणि विविध कार्यालयांमध्ये झेंड्यांची मागणी प्रचंड आहे मात्र ते पुरवताना विक्रेत्यांची दमछाक होत आहे अभियानाची पूर्वकल्पना असती तर आम्ही अधिक तयारी केली असती अशा प्रतिक्रिया लालबागमधील तिरंगा विक्री करणाऱ्या छोट्या व्यासायिकांनी व्यक्त केल्या आहेत
मला पूर्व कल्पना दिली असती तर बरं झालं असतं देशात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात झेंड्यांची विक्री होते त्यासाठी सुरतमधील कारखान्यांना आगाऊ रक्कम देऊन आधीच ऑर्डर बुक केली जाते यंदा ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त थोडी जास्त तयारी केली होती त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानाची घोषणा केली झेंड्यांच्या नियमात काही बदल केले गेले त्यामुळे आमच्याकडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली नागरिकांबरोबरच खासगी शासकीय कार्यालये आणि छोट्या मोठ्या राजकीय पक्षांतील नेते मंडळींकडून मागणी होत आहे त्यामुळे आम्ही नियोजनात कमी पडलो अभियानाची आम्हाला पूर्वकल्पना असती तर आम्ही आणखी तयारी केली असती असे मुंबई लालबागमधील झेंडा विक्रेत्यांनी सांगितले
कारखाने रात्रं दिवस सुरू हर घर तिरंगा अभियानांतर्गत देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर राष्ट्रध्वज फडकावला जाणार आहे अभियान यशस्वी करण्यासाठी शासकीय कार्यालयापासून राजकीय कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत केंद्र सरकारने झेंड्यांच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत आता नागरिक आपल्या घरी दिवस रात्र तिरंगा फडकवू शकणार आहेत त्यामुळे झेंड्यांची मागणी वाढली आहे मुंबईतही झेंडा तयार करणारे कारखाने रात्रंदिवस सुरू आहेत हजारो झेंड्यांची मागणीअनेक वर्षांपासून प्रचार सामुग्रीची विक्री करणाऱ्या लालबागमधील पारेख ब्रदर्सचे मालक योगेश पारेख म्हणाले की आम्ही यंदा झेंड्यांचीही विक्री करतोय मात्र अभियानाची माहिती आम्हाला उशिरा मिळाली त्याचा आम्हाला फटका बसतोय सध्या १४ बाय २१ च्या कापडी झेंड्यांना जास्त मागणी आहे काही ग्राहक दोन हजार ते २५ हजार झेंड्यांची ऑर्डर देत आहेत
सुरतमधील छपाई कारखान्यांना ऑर्डर द्यावी लागते सर्वाधिक ग्राहक मुंबईतील नगरसेवक आहेत मोहीम यशस्वी करण्यासाठी ते नागरिकांना मोफत झेंडे वितरित करणार आहेत त्यामुळे मागणी वाढली आहे परंतु ती पूर्ण करणे आता अशक्य आहे तिरंगा महागलागेल्या वर्षी १४ बाय २१ साधारण आकाराच्या कापडी झेंड्याची किंमत घाऊक बाजारात १६ रुपये होती तेव्हा २० रुपयांनी झेंडा विकला जात होता यंदा झेंडा घाऊक बाजारात सहा रुपयांनी महागला असून तो आता २२ रुपयांना मिळत आहे त्यामुळे आम्ही २५ रुपयांनी झेंडा विकत आहोत सुरतच्या बाजारातून आवक आशिया खंडातील सर्वांत मोठा कापड बाजार म्हणून गुजरातच्या सुरत शहराची ओळख आहे मुंबईतही छोटे व्यावसायिक प्रचार सामुग्री आणि झेंडे सुरतमधून मागवतात त्यासाठी तीनचार महिन्यांपूर्वी सुरतमधील छपाई कारखान्यांना ऑर्डर द्यावी लागते मात्र यंदा हर घर तिरंगा अभियानामुळे तेथील बाजारात झेंड्याला प्रचंड मागणी आहे परिणामी त्यांच्यावरही कामाचा ताण जास्त आहे आमच्या नवीन ऑर्डर स्वीकारल्या जात नाहीत अशी कैफियत लालबागमधील झेंडा विक्रेत्यांनी मांडली
खादीचे झेंडे महाग यंदा पहिल्यांदाच खादीशिवाय कुठल्याही प्रकारच्या कापडाच्या झेंड्याला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे त्यामुळे बाजारात अगदी ३० रुपयांनाही झेंडा मिळत आहे खादीचा झेंडा त्या तुलनेने महाग आहे म्हणून नागरिक इतर झेंड्याचा पर्याय स्वीकारत आहेत त्यामुळे पांरपरिक खादीचा झेंडा उत्पादन करणारे संकटात सापडले आहेत देशात पहिल्यापासून खादीचा झेंडा पांरपरिक पद्धतीने तयार होतो प्रथमच केंद्र सरकारने नियमात बदल केल्यामुळे आता इतर कापडापासून तिंरगा बनवायला मंजुरी मिळाली आहे मात्र अजूनही काही ग्राहकांकडून खादीच्या तिंरग्याची मागणी होते मात्र ते दराबाबत घासाघीस करत असल्यामुळे बहुतांश ऑर्डर रद्द होत असल्याचे सेवाग्राम खादी संचालक बळवंत ढगे यांनी सांगितले आहे
हेही वाचा Har Ghar Tiranga जाणून घ्या ध्वजारोहण करतानाचे नियम