ETV Bharat / city

मुंबई महापालिकेच्या अंदाजात चूक, अर्ध्या किमतीत पुलांची रंग रंगोटी - नानालाल मेहता उड्डाण पुल

महापालिकेने पुलांच्या सौंदर्यीकरणासाठी ८ कोटी ७२ लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते. तर, पात्र कंत्राटदाराने हे काम ४ कोटी ७६ लाखात करण्याची तयारी दाखवली आहे. सर्व करांसह हे काम ६ कोटी ६२ लाख रुपयांमध्ये होणार आहे. या ३२ पैकी एका पुलाची रंगरंगोटी, सौंदर्यीकरण तसेच भित्ती चित्रांचे काम प्रायोगिक तत्वावर करण्यात येईल. हे काम समाधानकारक असल्यास इतर पुलांची कामे करुन घेण्यात येतील असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

bmc
मुंबई महापालिकेच्या अंदाजात चूक
author img

By

Published : Mar 22, 2022, 8:59 AM IST

मुंबई - मुंबई महापालिकेकडून विकास कामे केली जातात. त्यासाठी अंदाजित किंमत ठरवून त्यानुसार निविदा काढल्या जातात. मात्र पालिकेने दिलेला अंदाज हा वेळोवेळी चुकत असल्याचे समोर आले आहे. ३२ पुलांच्या रंगरंगोटीसह सौंदर्यीकरणासाठी ८ कोटी ७२ लाखांचा खर्च अंदाजित ठरविण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात या कामाचा खर्च ४ कोटी ७६ लाख रुपये येणार आहे.

आधी प्रायोगिक तत्वावर, नंतर काम
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनामुळे विकास कामे झाली नव्हती. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर मुंबईतील विकास कामांना गती मिळाली आहे. मुंबई शहर विभागातील ३२ पुलांची रंगरंगोटी तसेच सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय महानगर पालिकेने एप्रिल २०२१ मध्ये घेतला आहे. या पुलांच्या रंगरंगोटीसह भित्ती चित्रे काढून त्यांचे सौदर्यही वाढविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष हे काम आता होणार आहे. महापालिकेने हे काम करण्यासाठी ८ कोटी ७२ लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते. तर, पात्र कंत्राटदाराने हे काम ४ कोटी ७६ लाखात करण्याची तयारी दाखवली आहे. सर्व करांसह हे काम ६ कोटी ६२ लाख रुपयांमध्ये होणार आहे. या ३२ पैकी एका पुलाची रंगरंगोटी, सौंदर्यीकरण तसेच भित्ती चित्रांचे काम प्रायोगिक तत्वावर करण्यात येईल. हे काम समाधानकारक असल्यास इतर पुलांची कामे करुन घेण्यात येतील असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रिटीशकालीन पुलांचा समावेश !
या ३२ पुलांमध्ये दक्षिण मुंबईतील ब्रिटीश कालीन पुलांचाही समावेश आहे. त्याच बरोबर दादर येथील नानालाल मेहता उड्डाण पुल, दादर हिंदमाता येथील हिंदमाता उड्डाण पुल या पुलांचाही समावेश आहे. या दोन्ही पुलांच्या खाली पालिकेने उद्यान तयार केले आहे. तसेच पुलाच्या खालील भागाचे सौंदर्यीकरणही करण्यात आले आहे. त्यानंतर आता पुन्हा या पुलांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.