ETV Bharat / city

Maharashtra Cabinet Expansion 2022 : मंत्रिमंडळ विस्तार झाला, आज रात्री होणार खातेवाटप ! - Cabinet

Maharashtra Cabinet Expansion 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्मरणार्थ मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा आज पार पडला असून या विस्तारामध्ये एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. राज भवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकारमधील आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही.

Maharashtra Cabinet Expansion 2022
Maharashtra Cabinet Expansion 2022
author img

By

Published : Aug 9, 2022, 1:30 PM IST

Updated : Aug 9, 2022, 2:29 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्मरणार्थ मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा आज पार पडला असून या विस्तारामध्ये एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. राज भवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकारमधील आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. तसेच नाराजी असल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी सक्षम असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी सांगितला आहे. तसेच आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही प्रमुख नेते चर्चा करून खातेवाटप बाबत निर्णय घेणार असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली आहे.

खातेवाटप बाबत निर्णय - मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणी आमदार नाराज नाही. जर, कोणी आमदार नाराज असेल तर, त्याची नाराजी पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दूर केली जाईल. तसेच राज्यामध्ये असलेलं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करेल. गेल्या अडीच वर्ष महाराष्ट्रात असलेले महाविकास आघाडीचे सरकारमध्ये महाराष्ट्र मागे पडला होता. मात्र, आता नवीन सरकार हे जनतेसाठी काम करेल. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर पुन्हा एकदा जबाबदारी टाकली असून ही जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू अशी आशा एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे.

तसेच आज राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिला टप्पा पार पडला असून खातेवाटप बाबत अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही प्रमुख नेते चर्चा करून खातेवाटप बाबत निर्णय घेणार असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली आहे.

जातीनिहाय संतुलन राखण्याचा प्रयत्न - त्यामुळे मुंबईवर अन्याय झाला असं काही मानण्याची गरज नाही सर्व विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. अत्यंत विचारपूर्वक असा हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला असून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळ विस्तार मधून करण्यात आला असल्या तर प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

प्रवीण दरेकर नाराज - मंत्रिपदे ही मर्यादित असतात आणि इच्छुकांची संख्या अधिक असते. मात्र असं असलं तरी भारतीय जनता पक्षामध्ये देखील कोणतीही नाराजी नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मान्य असतो. आपल्यालाही या आधी पक्षाने मोठ्या जबाबदाऱ्या दिले आहे. न मागता आपल्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते भारतीय जनता पक्षाने दिले. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये योग्य तो सन्मान हा प्रत्येकालाच दिला जातो असतं प्रवीण दरेकर यांनी आपल्या नाराजी बाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना व्यक्त केले.

हेही वाचा - Nitish To Meet Governor : मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली, भाजपसोबतची युती तोडणार?

Last Updated : Aug 9, 2022, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.