मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) नवी मुंबई येथील एका व्यापाऱ्याला बलात्काराच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्काराच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात अटकपूर्व जामीन( Prearrest bail to businessman in rape case) मिळावा याकरिता व्यापराच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आले होते, त्यावेळी न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की महिला बारा वर्षाची होती, त्यावेळी तिच्या आरोपी व्यापाऱ्याने तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला होता असे म्हटले आहे. अत्याचाराच्या वेळी अल्पवयीन असलेल्या महिलेने अलिबागमध्ये महिनाभरापूर्वी तक्रार नोंदवली होती. मात्र सध्या महिला 28 वर्षाची आहे. पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की 1994 मध्ये तिच्या पालकांच्या निधनानंतर 3.50 लाख रुपये सोने आणि रोख रक्कम घेऊन घर सोडले. तिच्या संपर्कात आल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आपल्या निहित स्वार्थासाठी पैसे वापरल्याचा आरोप तिने केला होता. ही घटना घडली तेव्हा ती 12 वर्षांची होती.
यापूर्वी का दाखल केली नाही तक्रार : न्यायालयाने असे म्हटले आहे की, पीडित महिलेने तिच्या जीवनातील प्रसंग सांगितले ते कौतुकास्पद आहे. पण त्यामुळे आत्मविश्वास निर्माण होत नाही. महिलेने सांगितले की ती गेल्या 28 वर्षांपासून आरोपीच्या संपर्कात आहे. परंतु तिने यापूर्वी तक्रार का दाखल केली नाही, हे स्पष्ट केले नाही असे म्हटले आहे. त्यामुळे आरोपीला अंतरिम दिलासा मिळणे आवश्यक असून अटकपूर्व जामीनवारच्या मंजूर केला आहे. जर आरोपीला अटक झाल्यास आरोपीने एक किंवा अधिक जामिनांसह 25,000 रुपयांचा वैयक्तिक बाँड सादर केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना सोडावे असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहे. आरोपींनी पुराव्याशी छेडछाड करू नये, किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. खंडपीठाने त्याला पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी आणि तपासात सहकार्य करण्यासाठी आपला फोन आत्मसमर्पण करण्यास सांगितले.