ETV Bharat / city

Assistant Professor Doctors Strike : सहा दिवसांपासून मुंबईत अस्थायी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांचे आंदोलन सुरूच - Medical Education Minister Amit Vilasrao Deshmukh

महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयामधील ( Government Medical College in Maharashtra ) अस्थायी सहाय्यक प्राध्यापक यांनी त्यांच्या सेवा नियमीत करण्यासाठी 17 जानेवारी 2022 पासून जे जे महाविद्यालय परिसरात साखळी उपोषण सुरु केले ( Temporary Assistant Professor Doctors Strike ) आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सहा दिवसांपासून मुंबईत अस्थायी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांचे आंदोलन सुरूच

author img

By

Published : Jan 23, 2022, 5:53 PM IST

मुंबई - कोरोनाकाळ असतानाच महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयामधील ( Government Medical College in Maharashtra ) अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांनी त्यांच्या सेवा नियमीत करण्यासाठी 17 जानेवारी पासून जे जे महाविद्यालय परिसरात साखळी उपोषण सुरु केले ( Temporary Assistant Professor Doctors Strike ) आहे. महाराष्ट्र राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जे जे महाविद्यालयात महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रतिनिधी साखळी उपोषणला बसले आहेत. परंतु बऱ्याच कालावधीपासून शासन दरबारी न्याय भेटत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्ते विविध प्रकारे आंदोलन करत आहेत.

सहा दिवसांपासून मुंबईत अस्थायी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांचे आंदोलन सुरूच

गरिबांचा आहार बनला करोना योद्ध्याचा आधार!

नुकतेच या डॉक्टरांनी अस्थायी सहाय्यक प्राध्यापक सेवा नियमित करण्यासाठी गोर गरिबांचा आधार असलेले झुणका-भाकर आंदोलन केले. ज्या पद्धतीने सरकार महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक डॉक्टरांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे ते पाहता जे जे मधील वरिष्ठ अध्यापक व उपोषणकर्ते अस्थायी सहाय्यक प्राध्यापक यांची अवस्था झुणका- भाकर खाऊन उपजीविका भागवण्यावर आली आहे. लोकशाही मार्गाने अस्थायी सहाय्यक प्राध्यापक हे साखळी उपोषण करत असताना झुणका-भाकर आंदोलनाने सरकारचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सध्या गोरगरिबांचा आहार असलेला झुणका-भाकर करोना योद्ध्यांचा आहार बनला आहे.

शासनाने लवकर दखल घेणे गरजेचे

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख ( Medical Education Minister Amit Vilasrao Deshmukh ) यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सेवा नियमित होण्याची रास्त मागणी लाल फितीत अडकलेली आहे. सेवा नियमित करण्याचा कॅबिनेट निर्णय तात्काळ घेण्यासाठी सेवा नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने लवकर घेऊन त्यांचा उचित सन्मान करावा ही या झुणका- भाकर आंदोलनाची भूमिका आहे, असे अस्थायी सहायक प्राध्यापकांनी सांगितले.

कॅन्डल मार्चचे केले होते आयोजन

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अस्थायी सहाय्यक प्रध्यापक यांच्या सेवा नियमीत करण्यात येतील असे आश्वासन दिले होते. परंतु दोन वर्षाचा कालावधी उलटला तरी सेवा नियमित झाल्या नाहीत. प्रशासन स्तरावर हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जे जे मधील साखळी उपोषण चालु राहील, असे अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या प्रतिनिधीद्वारे सांगितले आहे. अस्थायी सहाय्यक प्राध्यपकांच्या सेवा नियमित करण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जे जे महाविद्यालयत परिसरात नुकतेच कॅन्डल मार्चचेही आयोजन करण्यात आले होते. या कॅन्डल मार्चमध्ये जे जे महाविद्यालयामधील सर्व व महाराष्ट्रातील इतर वैद्यकिय महाविद्यालयातील प्रतिनिधी म्हणून आलेले अस्थायी सहाय्यक प्राध्यपक, वैद्यकिय अधिकारी व आंतरवासीय विद्यार्थी सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.