मुंबई - दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाइन ( 10th 12th Exams Offline ) होणार आहेत. या परीक्षांची तयारी तीन महिन्या आधीपासुनच शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार या परीक्षा होणार आहेत. परीक्षा या ऑफलाइनच घेण्यात याव्यात असं शिक्षण तज्ञांचे मत आहे. तसेच यासाठी विद्यार्थी आणि पालक देखील आग्रही असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच ऑनलाइन परीक्षेबाबत कोणाच्या काही सूचना असल्यास, त्या देखील विचारात घेतल्या जातील असही आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
दहा हजार संविधानाच्या प्रति वाटप -
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या आज वाढदिवसानिमित्त दहा हजार विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रति वाटपाचा कार्यक्रम करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.
ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थांनी केले होते आंदोलन -
परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात यासाठी दोन दिवसापूर्वी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे या सहित राज्याच्या काही ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुंबई तर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर देखील विद्यार्थ्यांना एकत्र जमून परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत चर्चा करून निर्णय काढला जाईल असे आश्वासन वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आले होते. त्यावर त्यांनी आज
डिसले गुरुजींच्या शिक्षणाचा फायदा सर्व शाळांना व्हावा -
ग्लोबल अवॉर्ड जिंकणारे शिक्षक रणजीतसिंह डीसले यांच्या सुट्टी बाबतचा वाद सध्या शिक्षण विभागात सुरू आहे. या विषयावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डिसले गुरुजींनी घेतलेल्या शिक्षणाचा फायदा राज्यातील सर्व शाळांना व्हावा.
हेही वाचा - Sanjay Raut on BJP : '...हम झुकेंगे नही!' - संजय राऊतांचा फिल्मी स्टाईल इशारा