ETV Bharat / city

Dussehra Gathering: दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गट तयारीत! वाहतूक व्यवस्थेवर कोट्यावधिंचा खर्च - ठाकरे शिंदे गटाची दसरा मेळाव्यासाठी तयारी

शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी विचारांचा सोनं लुटण्यासाठी या अशा घोषवाक्याने केला जातो. मात्र, शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर दोघांनीही दसरा मेळावा प्रतिष्ठेचा केला आहे. यंदा मुंबईत दसरा मेळाव्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार आहे. दोन्ही गटाकडून वाहतूक आणि संजोयनावर कोट्यवधी रूपये खर्च केले जाणार आहेत.

ठाकरे विरुद्ध शिंदे
ठाकरे विरुद्ध शिंदे
author img

By

Published : Sep 28, 2022, 8:09 PM IST

मुंबई - शिवसेनेने दसरा मेळावा शिवाजी पार्क येथेच घ्यायला न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर आता शिवसेनेने वाजत या गाजत या पण शांततेत या अशी हाक देत मुंबईत दसरा मेळाव्यानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व विभाग प्रमुखांना जबाबदारी दिली आहे.

शिवसेनेचे बारा विभाग प्रमुख - मुंबई शहर परिसरात शिवसेनेचे बारा विभाग प्रमुख आहेत. या विभाग प्रमुखांना महापालिकेच्या 227 प्रभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. एका प्रभागातून किमान चार बसेस भरून शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर येणे अपेक्षित आहे. म्हणजेच मुंबईतून शिवाजी पार्क सुमारे 900 बसेस येणार आहेत. यासाठी सातत्याने गटप्रमुख शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्या बैठका होत आहेत.

यंदाचा दसरा मेळावा हा शक्ती प्रदर्शनाचा मेळावा असल्याने त्यासाठी जोरदार तयारी शिवसेनेकडून करण्यात येत आहेत. मुंबईतून किमान 50000 शिवसैनिकांनी हजेरी लावणे अपेक्षित असून ठाणे पालघर नवी मुंबई रायगड आणि उर्वरित महाराष्ट्रातून किमान 50 हजार असे एक लाख शिवसैनिकांचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे. अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

कशी असेल पार्कतील व्यवस्था? - यंदा शिवसेनेच्या वतीने खुर्च्या मांडण्यात येणार असून बाहेरून येणाऱ्या शिवसैनिकांना अल्पोपहार आणि पाणी त्यांच्या खुर्चीवरच मिळणार आहे. यासाठी सुमारे 30 ते 40 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच, बसेसच्या भाड्यापोटी लाखो रुपये खर्च केले जाणार आहेत.

शिंदे गटाची ही जोरदार तयारी - शिवसेनेला शह देण्यासाठी तेवढ्याच ताकदीने बीकेसी येथील मैदानावर शक्तिप्रदर्शन करण्याचा शिंदे गटाने निर्धार केला आहे, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवनकर यांनी दिली आहे. त्यासाठी शिंदे गटाकडून राज्य सरकारकडे सुमारे चार हजार 100 एसटी बसेसची मागणी एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध होणे सध्या तरी शक्य दिसत नाही. तसे झाल्यास राज्यातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. शिवाय मुंबईत एवढी वाहने पार्क करणे ही शक्य होणार नाही. त्यामुळे शिंदे गटाला आठशे ते हजार गाड्या मिळण्याची शक्यता आहे.

सत्तार यांनी केले 300 एसटीचे बुकिंग - कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाडा आणि औरंगाबाद परिसरातून शिंदे गटाच्या शिवसैनिकांना मुंबईत दसरा मेळाव्यासाठी जाण्यासाठी एसटी महामंडळाकडे 300 एसटी बुकिंग करण्याचे मागणी पत्राद्वारे केली आहे. तर आता रायगडाला जाग आली असून रायगडामधूनही हजारो शिवसैनिकांना या दसरा मेळाव्याला आपण आणणार आहोत त्यासाठी व्यवस्था सुरू केली असल्याची माहिती आमदार भरत भोगावले यांनी दिली आहे. जळगावमधून तीन रेल्वे गाड्या बुक करण्यात आल्या असून, एका रेल्वेसाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च येणार आहे एकूण 75 लाख रुपये या रेल्वे बुकिंग साठी खर्च करण्यात आले आहेत.

कोट्यवधी रुपयांचा वाहतूक खर्च - एसटी महामंडळाच्या गाडीचा एक किलोमीटरचा दर 55 रुपये आहे. जर औरंगाबाद जिल्ह्यातून एक गाडी मुंबईला आणायची असेल तर 400 किलोमीटर अंतर असल्याने एसटीचे एका वेळेचे भाडे 22 हजार रुपये होणार आहे. तर सत्तार यांनी मागणी केलेल्या तीनशे गाड्यांसाठी 66 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या गाड्यांची संख्या पाहता हा आकडा कोट्यवधीमध्ये जाण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवसैनिकांची होणारी आणि गाड्यांची गर्दी पाहता दसऱ्या दिवशी मुंबईत प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याचा ताण कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेवर येणार असल्याने पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.