ETV Bharat / city

Shivsena symbol issue : आता चिन्हातही शिंदे गटाची कुरघोडी ; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी डाव - शिवसेनेचे नाव आणि चिन्ह

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवल्यानंतर दोन्ही गटांना पर्यायी नावे आणि चिन्हे सुचवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले (Shivsena symbol issue) होते. ठाकरे यांनी आपली नावे आणि पर्यायी चिन्हे रविवारीच निवडणूक आयोगाला कळवली मात्र शिंदे गटाने यातही सारखी चिन्हे मागून ठाकरे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला (Thackeray and Shinde faction) आहे.

Shivsena symbol issue
शिवसेनेच्या चिन्हाचा वाद
author img

By

Published : Oct 10, 2022, 2:41 PM IST

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवल्यानंतर दोन्ही गटांना आपापले पर्याय देण्याचे निर्देश दिले (Shivsena symbol issue) होते. सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांनी नावे देणे अपेक्षित (Thackeray and Shinde faction) होते.

प्रतिक्रिया देताना जेष्ठ कायदे तज्ञ असीम सरोदे

ठाकरे गटाचे नावे आणि पर्याय - त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे दिली आहे तर उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल या चिन्हांची मागणी केली (Thackeray Shivsena symbol issue) आहे.

का या चिन्हांची मागणी ? या चिन्हांमध्ये उगवता सूर्य हे उदयाचे नवनिर्मितीचे आणि विकासाचे प्रतीक आहे, त्रिशूल हे धर्माचे हिंदुत्वाचे आणि आक्रमकतेचे प्रतिक आहे, तर मशाल क्रांतीचे प्रतीक आहे. त्यामुळे यापैकी एक चिन्ह मिळाल्यास शिवसेना आपली प्रतिमा कायम ठेवू शकणार आहे.

शिंदे गटाकडून पर्याय ? शिंदे गटाकडूनही सुरुवातीला तुतारी, तलवार आणि गदा या नावाचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र यामध्ये आयत्या वेळेस बदल करून शिंदे गटाने शेवटच्या क्षणी त्रिशूल उगवता सूर्य आणि गदा ही तीन चिन्हे सादर केली आहेत. याशिवाय नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब धर्मवीर दिघे ही तीन नावे मागितली (Shinde faction Shivsena symbol issue) आहेत.

सारख्या नावांची आणि चिन्हांची मागणी - यामध्ये शिंदे गटाने शिवसेनेने मागणी केलेल्या त्रिशूल आणि उगवता सूर्य या दोन चिन्हांची मागणी केली आहे त्याचप्रमाणे शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे या दोन समान नावांची ही मागणी केली आहे.

समान नावे बाद होऊ शकतात - यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग सर्वात आधी जी समान नावे आहेत, ती बाजूला करण्याची शक्यता आहे. शिवसेनेला त्यांनी मागणी केलेली महत्त्वाची नावे मिळू नये यासाठी शिंदे गटाकडून ही खेळी खेळली असावी अशी प्रतिक्रिया जेष्ठ कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे निवडणूक आयोगाने जर त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या चिन्हांमधून पर्याय निवडण्यास सांगितले असेल तर त्याचा आधी विचार केला जाईल. शिवसेनेने जर त्यापेक्षा वेगळ्या चिन्हांची मागणी केली असेल, तर निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पहावं लागेल, असेही सरोदे म्हणाले. त्याचप्रमाणे चिन्हांच्या बाबतीतही उगवता सूर्य आणि त्रिशूल हे चिन्ह शिंदे गटाला ही महत्त्वाची वाटली असावी, म्हणून त्याची मागणी केल्यानंतर ती बाद होतील याची काळजी घेतली गेली आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाकडे शिवसेनेसाठी मशाल आणि शिंदे गटासाठी गदा हा एकच पर्याय शिल्लक राहतो. यातही गदा आणि मशाल ही चिन्हे जवळपास सारखीच दिसणारी आहेत त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा डाव आहे, असेही सरोदे यांचे मत आहे.

बाळासाहेबांच्या नावसाठी परवानगीची आवश्यकता ? दरम्यान एखाद्या व्यक्तीचे नाव पक्षाच्या नावात वापरायचे असेल, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे बाळासाहेब यांचे नाव वापरण्यासाठी निवडणूक आयोग काय निर्णय घेते ? हे महत्त्वाचे ठरणार आहे असेही सरोदे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.