ETV Bharat / city

मेट्रो 2अ आणि 7मधील स्थानकाच्या जाहिरातीसाठी मागवल्या निविदा

author img

By

Published : Mar 9, 2021, 7:20 PM IST

मेट्रो 2अ आणि 7मधील मेट्रो स्थानकाच्या जाहिरातीचे अधिकार खासगी कंपन्याना पाच वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नुकतेच एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत.

Metro advertisement Tenders
Metro advertisement Tenders

मुंबई - कोट्यवधी रुपये खर्च करत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून मेट्रो प्रकल्प राबवले जात आहेत. तेव्हा मेट्रो प्रकल्पावर करण्यात आलेला हा खर्च वसूल करण्यासाठी आणि उत्पन्नाचा एक चांगला स्रोत तयार करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो 1मधील धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार मेट्रो 2अ आणि 7मधील मेट्रो स्थानकाच्या जाहिरातीचे अधिकार खासगी कंपन्याना पाच वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नुकतेच एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत.

मेट्रो 1मध्ये जाहिरातीचा प्रयोग यशस्वी

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 प्रकल्प मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)द्वारे कार्यान्वित केला जातो. तर या मार्गाची उभारणीही एमएमओपीएलनेच केली आहे. अशावेळी या मेट्रो प्रकल्पासाठी आलेला खर्च आणि सध्या मेट्रो व्यवस्थापन, देखभालीसाठी लागणारा खर्च याचा विचार करता एमएमओपीएला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे यातून थोडे फार सावरण्यासाठी एमएमओपीएलने मेट्रो स्थानकाच्या ब्रँडिंग आणि जाहिरातीचे अधिकार खासगी कंपन्यांना दिले. यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. तेव्हा आता एमएमआरडीएने ही एमएमओपीएलच्या पावलावर पाऊल टाकत मेट्रो 2अ आणि 7मधील स्थानकाचे ब्रँडिंग आणि जाहिरातीचे अधिकार खासगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे.

मेमध्ये सुरू होणार हे दोन्ही मार्ग

मेट्रो 2अ आणि 7 या प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. तर रोलिंग स्टॉकच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. पहिली देशी बनावटीची मेट्रो मुंबईत या मार्गासाठी दाखल झाली आहे. लवकरच आणखी 10 गाड्या मुंबईत येणार आहेत. तर मेट्रोची मिनी ट्रायल रन यशस्वी झाली असून लवकरच ट्रायल रन ही होणार आहे. एकूणच मेमध्ये हे दोन्ही मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्यासाठी एमएमआरडीएने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पासाठी आलेला खर्च आणि भविष्यात व्यवस्थापन तसेच देखभालीसाठी येणारा खर्च केवळ तिकीटातून वसूल करणे शक्य नाही. हीच बाब लक्षात घेत एमएमआरडीएने मेट्रो 2अ आणि 7 प्रकल्पातील मेट्रो स्थानकातील जाहिरातीचे अधिकार खासगी कंपनीला देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मेमध्ये प्रकल्प सुरू होताना दुसरीकडे उत्त्पन्न कसे वाढेल याचाही विचार एमएमआरडीएने केला आहे. त्यानुसार 5 वर्षासाठी हे अधिकार बहाल करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागवली आहे. तर यातून चांगले उत्पन्न मिळवण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.