ETV Bharat / city

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत १० लाख मास्कचे वाटप करणार - भाई जगताप

काँग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ७५ लाख मास्कपैकी मुंबईत १० लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज केली. मुंबई काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधान व भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

rajiv gandhi death anniversary program
rajiv gandhi death anniversary program
author img

By

Published : May 21, 2021, 6:22 PM IST

मुंबई - भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ७५ लाख मास्कपैकी मुंबईत १० लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज केली. मुंबई काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधान व भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतील आझाद मैदान जवळील मुंबई काँग्रेस कार्यालयाजवळ सर्व धर्म समभाव प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस भाई जगताप बोलत होते.

प्रतिक्रिया

काँग्रेसतर्फे ७५ लाख मास्कचे वाटप -

भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती असो किंवा पुण्यतिथी असो, हा दिवस आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा देणारा आणि या देशामध्ये काही विशिष्ट कामाची सुरुवात करणारा दिवस असतो. त्यामुळेच आमचे राष्ट्रीय नेते गुलाम नबी आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची देशामध्ये एक टास्क फोर्स तयार झालेली आहे. त्यानुसार देशातील आम्हा सर्व नेत्यांना त्यांनी एक जबाबदारी दिलेली आहे आणि विशेषतः महाराष्ट्र आणि मुंबईने सर्वात जास्त जबाबदारी उचललेली आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसतर्फे आम्ही एकूण ७५ लाख मास्कचे वाटप करणार आहोत. त्यातील १० लाख मास्कचे वाटप मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईमध्ये करण्यात येणार आहे. तर ६५ लाख मास्कचे वाटप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मास्कचे वाटप अजूनपर्यंत भारतातील इतर कोणत्याही राज्यात यापूर्वी झालेले नाही. याची सुरुवात आम्ही आज मुंबईतून करत असल्याचे जगताप म्हणाले.

आमदाराने २ रुग्णवाहिका सुरु कराव्यात -

देशात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णवाहिका सेवा ही अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्व आमदारांना सूचना केलेली आहे की, प्रत्येक आमदाराने २ रुग्णवाहिका सुरु कराव्यात आणि त्यानुसार प्रत्येक आमदाराने आवश्यक तो पत्रव्यवहार करून रुग्णावाहिका सुरु केलेल्या आहेत. पालकमंत्री अस्लम शेख यांनी सुद्धा २ रुग्णवाहिका सुरू करून, आणखी अधिकच्या २ रुग्णावाहिका सुरु करण्याची घोषणा केली आहे. ज्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात कोविडची महामारी होत आहे. त्या प्रमाणात कोविड महामारीचा प्रतिकार करण्याची यंत्रणा उभी करण्याचे प्रयत्न करत आहोत, असे जगताप म्हणाले.

हेही वाचा - चार मुलींनी दिला आईच्या मृतदेहाला खांदा, तर पाचव्या मुलीने दिला मुखाग्नी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.