मुंबई: वरवरा राव यांना भीमा-कोरेगाव, एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्या प्रकरणी एनआयएने अटक केलेली आहे. उच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्यामध्ये वाढत असलेली कोरोनाचे रुग्णांची संख्या तसेच डॉक्टरांमध्ये होत असलेल्या कोरोनाचा संसर्ग या कारणामुळे पुन्हा वरवरा राव यांना दिलासा दिला असून त्यांना आत्मसमर्पण करण्याची मुदत 5 फेब्रुवारी पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.
निवासस्थानी जाण्याची परवानगीची मागणी
आजारपणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात वरवरा राव यांना कडक अटी शर्तींवर अंतरिम जामीन मंजूर केला त्यावेळी वैद्यकीय जामीनाचा कालावधी संपण्यापूर्वी शरण येण्याचे निर्देश दिले होते. वरवरा राव सध्या मालाड येथे भाड्याने राहत असून पुढील उपचारांचा खर्च त्यांना परवडत नसल्याने त्यांना हैद्राबाद येथील निवासस्थाळी जाण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच राव यांचा जामिनाचा अवधीही वाढविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका राव यांच्यातीने दाखल करण्यात आली आहे.
कोण आहेत वरवरा राव?
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार झाला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या दरम्यान अनेक वाहनेही जाळली गेली. वरवरा राव हे तेलुगू डाव्या विचारसरणीचे कवी आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते त्यांच्या क्रांतीकारक कवितांसाठी ओळखले जातात. ते तेलुगू साहित्याचे प्रख्यात मार्क्सवादी समिक्षक मानले जातात. राव अनेक दशकांपासून अनेक विद्यार्थ्यांना या विषयावर शिकवत आहेत. राव हे वीरसमचे (क्रांतिकारक लेखक संघटना) संस्थापक सदस्यदेखील आहेत.