ETV Bharat / city

राज्यभरातील शिक्षक सोमावरी काळ्याफिती लावून काम करणार; दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मागील २० महिन्यांपासून शासनाकडे ३२ मागण्या केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे शासनाविरोधात ५ जुलै २०२१ रोजी काळ्या फिती लावून काम करत राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांच्या मागण्यांबाबत जिल्हा तालुका विभाग, राज्य स्तरांवर शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Jul 2, 2021, 12:57 PM IST

मुंबई- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मागील २० महिन्यांपासून शासनाकडे ३२ मागण्या केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे शासनाविरोधात ५ जुलै २०२१ रोजी काळ्या फिती लावून काम करत राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांच्या मागण्यांबाबत जिल्हा तालुका विभाग, राज्य स्तरांवर शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.

३२ मागण्यांचे दिले निवेदन-

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर शिक्षक परिषदेने तीव्र, उग्र आंदोलन टाळले असून शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचे शिक्षक परिषद कार्यकारिणी ने निर्णय घेतला आहे. शिक्षक परिषदेचे नागपूर विभागाचे शिक्षक असणारे एकमेव आमदार नागो गाणार यांनी १ जुलै २०२१ ला शासनाला वेगवेगळ्या ३२ मागण्यांचे निवेदन दिले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष वेणूनाथ कडू कार्यवाह नरेंद्र वातकर यांनी 30 जून रोजी शासनाला कळवले असून शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

काय आहेत मागण्या..?

राज्याच्या शिक्षकांच्या काही निवडक मागण्यांमध्ये, जुनी पेंशन योजना लागू करुन भविष्य निर्वाह निधी योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, १०, २०, ३० ही आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना लागू करणे, ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला व दुसरा हफ्ता तात्काळ देण्यात यावा, शिक्षकेत्तरांची पदे भरतीबाबतचा निर्णय रद्द करुन पूर्वीप्रमाणे भरती करण्यात यावी, कोरोनाग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विशेष रजा मंजूर करणे, कोरोनामुळे मृत कर्मचार्‍यांच्या वारसदारांना अनुकंपा योजना लागू करावी. अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची मुक्तता करणे, कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे, डी. सी. पी. एस. धारकांना पावत्या देण्यात याव्यात, क्रीडा विभाग अनुदानातील भ्रष्टाचार बंद करण्यात यावा, संस्था अंतर्गत वाद असणारी पदोन्नतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना देणे, आभासी पद्धतीच्या शिक्षण प्रणालीमध्ये एकसुत्रता यावी, वरिष्ठ व निवड श्रेणी ची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, अशा 32 प्रलंबित मागण्या शासनाने तात्काळ मान्य कराव्या. असे निवेदन राज्य अध्यू वेणूनाथ कडू, कार्यवाह नरेंद्र वातकर आमदार गाणार सर यांनी केले आहे.

घरीच काळ्या फिती लावून करणार निषेध-

मुंबईमध्ये वर्क फ्रॉम होम असल्याने घरीच काळ्या फिती लावून शिक्षक शिक्षकेतर निषेध व्यक्त करतील. निकालाच्या कामासाठी जाणारे शिक्षक शाळेत काळ्या फिती तसेच्या काम करतील, त्यांचे फोटो पाठवतील तसेच पदाधिकारी, शिक्षण निरीक्षक उत्तर, दक्षिण, पश्चिम विभाग यांना निवेदन देणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.