ETV Bharat / city

शासनाचा आज केव्हा उजाडणार? शिक्षकांना लोकल प्रवासास अजूनही परवानगी नाही

आज मिळेल, उद्या मिळेल पण अजूनही शिक्षकांना लोकल प्रवासास परवानगी मिळत नसून आज देखील शिक्षकांना रेल्वे स्थानकावरून परत जाऊन महागड्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शासनाचा आज नक्की केव्हा उजाडेल? असा संतप्त सवाल भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शासनाला केला आहे.

local train
local train
author img

By

Published : Jun 16, 2021, 8:57 PM IST

मुंबई - आज मिळेल, उद्या मिळेल पण अजूनही शिक्षकांना लोकल प्रवासास परवानगी मिळत नसून आज देखील शिक्षकांना रेल्वे स्थानकावरून परत जाऊन महागड्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शासनाचा आज नक्की केव्हा उजाडेल? असा संतप्त सवाल भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शासनाला केला आहे.

सरकारविरोधात प्रचंड नाराजी-

शालेय शिक्षण विभागाने पहिली ते नववी व अकरावीच्या शिक्षकांना ५० टक्के तर दहावीआणि बारावीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अंतर्गत मूल्यमापन होईपर्यंत १०० टक्के उपस्थितीचे आदेश काढले आहे. पण शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत जाण्यासाठी प्रवास कसा करावा याबाबत कोणतेही निर्देश दिले नाही. त्यातच लोकल फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना उपलब्ध असल्याने शिक्षकांना रोजच रेल्वे स्थानकातून तिकीट व पास न मिळाल्याने परत जावे लागतेय. दहावीच्या निकालाचे काम मुदतीत पूर्ण करण्याचे बंधन शिक्षण मंडळाने दिल्याने शाळेत जावे कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकदा निवेदन देऊन सुद्धा आतापर्यंत शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा दिली नाही. शासनाकडून सांगण्यात येत आहे की शिक्षकांना लोकल सेवेत मुभा देण्यात येईल. त्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, प्रत्येक्षात आतापर्यत लोकल सेवेत शिक्षकांना प्रवासात मुभा मिळालेली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये सरकारविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण निर्मना झाले आहेत.

शिक्षकांना अधिकृतपणे मुभा नाहीच-

शासनाच्या आदेशानुसारदहावीच्या निकालाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. याकरिता शाळेत जाण्यासाठी आपल्याला उपनगरीय रेल्वेतून प्रवासाची परवानगी मागत आहोत. परवानगी मिळवण्यासाठी पत्र देऊन विनंती केलेली आहे. सर्वच स्तरावर सतत प्रयत्न करत आहोत. मात्र अद्यापही रेल्वे प्रवासाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमावरी सर्व शिक्षक आपल्या घराजवळच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन सेल्फी आंदोलन केले आहे. याशिवाय आज दंड भरून लोकल प्रवास केला आहे. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आमच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलवले त्या भेटी दरम्यान आम्ही शिक्षकांच्या समस्या वर्षा गायकवाड समोर मांडल्या आहे. मात्र, आतापर्यंत शिक्षकांना लोकल प्रवासाची अधिकृतपणे मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षकांना मोठ्या प्रमाणात आज अडचणीचा सामना करावा लागत आहे अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.