ETV Bharat / city

तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारची 250 कोटींची मदत - तौक्ते चक्रीवादळ

तौक्ते वादळ नुकसानग्रस्तांचे लवकरात लवकर पंचनामे करून मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही नुकसानग्रस्तांची पाहणी केली. त्या पाहणीनंतर विजय वडेट्टीवार यांच्याकडून नुकसानग्रस्तांसाठी अडीचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

tauktae cyclone
tauktae cyclone
author img

By

Published : May 26, 2021, 5:49 PM IST

मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीसह इतर जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पाहणी दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 मे ला केला. नुकसान ग्रस्तांचे लवकरात लवकर पंचनामे करून मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून यावेळी देण्यात आले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही नुकसानग्रस्तांची पाहणी केली. त्या पाहणीनंतर विजय वडेट्टीवार यांच्याकडून नुकसानग्रस्तांसाठी अडीचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विजय वडेट्टीवार मांडतील अशीही माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर असलेल्या नागरिकांचे फळबागांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या सर्वांना योग्य ती नुकसान भरपाई राज्य सरकारकडून देण्यात येईल, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

केंद्राच्या मदतीसाठी पत्रव्यवहार -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातला एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र महाराष्ट्रासाठी अद्याप मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रासाठी देखील मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारबरोबर पत्रव्यवहार केला आहे. मदतीसाठी एनडीआरएफचे निकष लावण्यात येतात. ते आता बदलले गेले पाहिजेत. 2015 च्या NDRF निकष आहेत. त्या निकषानुसार हेक्‍टरी 6 हजार आठशे रुपये दिले जातात. ते निकष बदलावे अशी मागणी पत्रातून केली आहे. तातडीने एनडीआरएफ च्या टीमने केंद्र सरकारने नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी पाठवावी, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच विरोधी पक्षाने नुकसानग्रस्तांचा यांची पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यानंतर विरोधकांनी देखील एनडीआरएफ टीमने लवकरात लवकर नुकसान ग्रस्तांच्या पाहणी दौरा करावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा चिमटाही काढला. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासीयांचे जे नुकसान झाले होते, त्या नुकसानाची पूर्ण भरपाई राज्य सरकारकडून त्यावेळी करण्यात आली. त्यामुळे यावेळीही कोकणवासीयांचे झालेले नुकसान राज्य सरकारकडून दिले जाईल, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिले.

काही लोकांकडून मराठा समाजात तंटे निर्माण करण्याचा प्रयत्न -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही लोक मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटे यांनी घेतलेल्या भूमिकेवर देखील विजय वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला. तर तिथेच संभाजी राजे यांच्यासोबत मराठा आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.