ETV Bharat / city

Minister Aaditya Thackeray - पुढे चला हा आपला मंत्र आहे, पुढे चालत राहू - आदित्य ठाकरे - आदित्य ठाकरे

बेस्टला मुंबईची लाईफलाईन बोलले जाते. बेस्टमधून सुमारे 30 लाख प्रवासी रोज प्रवास करतात. रोजच्या प्रवासादरम्यान तिकीट काढण्यासाठी चिल्लर बाळगणे प्रवाशांना शक्य होत नाही. बेस्टच्या वाहकांकडेही काही चिल्लर दिली जाते. मात्र, प्रवाशांना सुट्टे पैसे दिल्यावर चिल्लर संपते. यामुळे इतर प्रवाशांना सुट्टे पैसे देताना अडचण होते. यासाठी बेस्टने "चलो" ऍपच्या माध्यमाने "चलो" कार्ड आणले आहे. या कार्डमध्ये पैसे भरल्यावर त्यामधून तिकीट काढता येते.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Apr 20, 2022, 3:36 PM IST

मुंबई - जाऊद्या मागे झाले ते गेले त्यात लक्ष न देता चलो ऍप घेऊन आपण पुढे चाललो आहोत. पुढे चला हा आपला मंत्र आहे, पुढे चालत राहू. आमचा मंत्र पुन्हा चला नाही, तर पुढे चला आहे, असा टोला राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. तर मनसेच्या हिंदुत्त्वाबाबतच्या भूमिकेबाबत बोलताना तुम्ही जास्त विचार करताय. चांगली कामे करतोय. सरकारचे कामही चांगले आहे. महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर लोकांचा विश्वास आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

पुढे चला हा आपला मंत्र - बेस्टच्या "टॅप इन टॅप आऊट" कार्डचे ( Tap in Tap Out Card ) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज गेट वे ऑफ इंडिया ( Gateway of India ) येथे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना, बेस्ट बसमध्ये चढल्यावर पुढे चला, असे बोलतात. असेच आपण पुढे जात आहोत आणि जात राहणार. पुढे चला हा आपला मंत्र राहिलेला आहे. बेस्टला ( BEST ) पुढे कसे नेता येईल यावर कायम बोलणं होतं असतं. बॉम्ब विस्फोट, पूर, कोविड काळ या सगळ्या काळात बेस्ट कायम धावत राहिली आहे. बेस्ट खरोखर बेस्ट आहे. बेस्टचे हे अमृत महोत्सव वर्ष आहे. बेस्टचा प्रवास इलेक्ट्रिकने सुरू झाला आणि आता पुन्हा आपण इलेक्ट्रिककडे आलो आहोत. डबलडेकर बस हव्यात हा माझा आणि मुख्यमंत्री यांचा सुरुवातीपासून आग्रह राहिला आहे. 900 इलेक्ट्रीक एसी डबल डेकर बस ऑगस्टपर्यंत रस्त्यावर धावताना दिसतील. एकूण 3 हजार 337 बस सध्या आपल्याकडे आहेत. 10 हजार बसची गरज आहे, या बस 100 टक्के पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक असाव्यात. यातील निम्म्या डबल डेकर बस असतील. मुंबईकरांना इज ऑफ लाईफसाठी आपण प्रयत्नशील आहोत. जगभरातील सर्वात स्वस्त आणि मस्त आपली बेस्ट आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पुढील आठवड्यात नॅशनल मोबिलिटी कार्डचे आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करत आहोत. हे कार्ड सगळ्या ठिकाणी चालेल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

बेस्टची डिजिटल सेवा - बेस्टला मुंबईची लाईफलाईन बोलले जाते. बेस्टमधून सुमारे 30 लाख प्रवासी रोज प्रवास करतात. रोजच्या प्रवासादरम्यान तिकीट काढण्यासाठी चिल्लर बाळगणे प्रवाशांना शक्य होत नाही. बेस्टच्या वाहकांकडेही काही चिल्लर दिली जाते. मात्र, प्रवाशांना सुट्टे पैसे दिल्यावर चिल्लर संपते. यामुळे इतर प्रवाशांना सुट्टे पैसे देताना अडचण होते. यासाठी बेस्टने "चलो" ऍपच्या माध्यमाने "चलो" कार्ड आणले आहे. या कार्डमध्ये पैसे भरल्यावर त्यामधून तिकीट काढता येते. तसेच ऍपमधूनही पैसे देऊन तिकीट काढता येते. त्यानंतर आता बेस्टने पूर्णपणे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असलेली "टॅप इन टॅप आऊट" सेवा भारतामध्ये सर्वप्रथम बेस्ट उपक्रमाद्वारे प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. बेस्टच्या "चलो स्मार्ट कार्ड" तसेच "चलो मोबाइल अॅप"द्वारे प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जगभरात मोबाइल अॅपद्वारे "टॅप इन टॅप आऊट" सेवा केवळ बेस्ट बसमध्ये प्रथमच उपलब्ध झाली आहे. या आधुनिक सेवेमुळे बस प्रवाशांना सुट्टे पैशांच्या कटकटीपासून कायमचा दिलासा मिळाला आहे. डिजिटल सेवेचा उपयोग करून आपला प्रवास अधिकाधिक बेस्ट करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमामार्फत करण्यात आले आहे. बेस्ट बस प्रवासा दरम्यान प्रवासी व वाहक या दोघांमधील सुट्ट्या पैशांवरुन होणाऱ्या भांडणावर पडदा पडणार आहे. प्रवाशांना आता तिकिट घेण्यासाठी सुट्टे पैसे बाळगण्याची गरज नसून प्रवाशांना कार्डची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बस वाहकाला कार्ड दिल्यास ते मशीनवर लावल्यास कार्डमधून पैसे कट होणार असून प्रवाशाला तिकीट मिळणार आहे.

कसे मिळेल, कसे वापरता येतील हे कार्ड -

  • बेस्ट प्रवासी कंडक्टर किंवा आगारातून 100 रुपयात कार्ड खरेदी करू शकतील.
  • कार्डला रिचार्ज करता येणार आहे.
  • बेस्टच्या प्रत्येक बसमध्ये हे कार्ड मशीन बसवण्यात आले आहेत.
  • “चलो" या कंपनीद्वारे हे कार्ड तयार करण्यात आले आहे.
  • प्रवासी बसमध्ये प्रवेश केल्यावर प्रवेश द्वारावर असलेल्या मशीनवर कार्ड "टॅप इन" करतील आणि त्यानंतर पुन्हा बसमधून उतरताना "टॅप आऊट” करुन तिकीट मिळणार आहेत.

हेही वाचा - Phone tapping case : राऊत खडसेंचे फोन समाजकंटक म्हणुन टॅप केल्याचा खुलासा, राऊतांची पुन्हा टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.