मुंबई - मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेच्या मध्य मार्गिकेवर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. त्यात रेल्वे प्रवासी जखमी झाले. तसेच लोकलमध्ये मोबाईल चोरी व सोनसाखळी चोरी सारख्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात जीआरपी पोलीस व रेल्वे पोलीस फोर्स या दोन्ही यंत्रणांनी एकत्र येऊन अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी बुधवारी मध्य रेल्वेचे आरपीएफ आयुक्त के के अश्रफ यांची भेट घेतली. रेल्वेच्या मध्य मार्गिकेवर गेल्या काही दिवसांपासून दगडफेक व मोबाईल चोरीच्या घटना घडल्याने अशा गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई केली जावी, अशी मागणी केल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.