मुंबई - राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांमधून आपले नाव वगळावे, अशी विनंती माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यपालांना केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधून आपण सर्व संबंध तोडून बाहेर पडत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकतीच केली आहे. या घोषणेनंतर महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या सदस्यांच्या यादीत आपले नाव असणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे हे नाव वगळण्याची विनंती राज्यपालांकडे शेट्टी यांनी केली आहे.
हेही वाचा - Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊतांना कुलाबा पोलीस स्टेशनचे समन्स