ETV Bharat / city

स्वराजांनी परदेशात अडकलेल्या 'त्या' मधुमेही रुग्णाला तत्काळ पुरवली होती आरोग्य सेवा - सुषमा स्वराज यांचे निधन

वेळेत औषध न मिळाल्यास हिमेश यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी मुंबईत असलेल्या नेहा देडिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली. केवळ 6 मिनिटांच्या आत सुषमा स्वराज यांनी नेहा देडिया यांच्या ट्विटर वरील विनंतीला प्रतिसाद देत तत्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

सुषमा स्वराज यांनी दक्षिण सुदान मध्ये अडकलेल्या मधुमेही रुग्णाला ६ मिनिटात पुरवली होती औषध
author img

By

Published : Aug 7, 2019, 5:05 PM IST

मुंबई - भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. मात्र, त्यांच्या आठवणी मुंबईकरांमध्ये आजही ताज्या आहेत. याचे कारण म्हणजे जवळपास 3 वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून ऑपरेशन संकटमोचन हाती घेण्यात आले होते. ज्या अंतर्गत सुषमा स्वराज यांनी नेहा देडीया यांच्या प्रति दाखवलेल्या तत्परतेमुळे ते आज मुंबईत आपल्या कुटुंबाकडे सुखरूप परतले आहेत.

सुषमा स्वराज यांनी दक्षिण सुदान मध्ये अडकलेल्या मधुमेही रुग्णाला ६ मिनिटात पुरवली होती औषध

2016 साली मुंबईतील बोरिवली परिसरात राहणाऱ्या नेहा देडिया यांनी सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून दक्षिण सुदानमध्ये अडकलेले त्यांचे पती हिमेश देडिया यांच्यासाठी मदत मागितली होती. हिमेश देडिया हे त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भात दक्षिण सुदान मध्ये गेले होते. या दरम्यान तेथील गृहयुद्धात हिमेश हे इतर भारतीयांसोबत अडकले होते.

हिमेश यांना मधुमेह असून त्यावेळी त्यांच्याकडील इन्सुलिन सुद्धा संपले होते. परस्थिती अशी निर्माण झाली होती, की वेळेत औषध न मिळाल्यास हिमेश यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी मुंबईत असलेल्या नेहा देडिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली. केवळ 6 मिनिटाच्या आत सुषमा स्वराज यांनी नेहा देडिया यांच्या ट्विटरवरील विनंतीला प्रतिसाद देत तत्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

Sushma Swaraj had assisted the trapped citizens in South Sudan
सुषमा स्वराज यांनी दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या मधुमेही रुग्णाला ६ मिनिटात पुरवली होती औषध

या नंतर हिमेश देडिया यांना केवळ औषधांची मदत पोहोचली नाही तर हिमेश यांच्या सोबत दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन संकटमोचन हाती घेऊन सर्व भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आले होते. त्यावेळी जनरल विके सिंग हे 2 विमान घेऊन दक्षिण सुदान मध्ये दाखल झाले व 150 भारतीयांना घेऊन भारतात परतले होते. सुषमा स्वराज यांच्या जाण्याने आपल्या कुटुंबातील कोणी जवळचा व्यक्ती गेल्याची भावना नेहा देडिया आज व्यक्त करत आहेत.

Intro:भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले मात्र त्यांच्या आठवणी मुंबईकरांमध्ये आजही ताज्या आहेत.याच करण म्हणजे जवळपास 3 वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून ऑपरेशन संकटमोचन हाती घेण्यात आले होते. ज्या अंतर्गत नेहा डेधिया ह्यांचे पती सुषमा स्वराज यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आज मुंबईत आपल्या कुटुंबाकड़े सुखरूप परतले आहेत.
Body:2016 साली मुंबईतील बोरिवली परिसरात राहणाऱ्या नेहा डेधिया यांनी सोशल मीडियावरील ट्विटर च्या माध्यमातून दक्षिण सुदान मध्ये अडकलेल्या त्यांचे पती हिमेश देडीया यांच्यासाठी मदत मागितली होती. हिमेश देडीया हर त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भात दक्षिण सुदान मध्ये गेले होते. या दरम्यान तेथील गृहयुद्धात हिमेश हे इतर भारतीयांसोबत अडकले होते.हिमेश यांना मधुमेह असून त्यावेळी त्यांच्याकडील इन्सुलिन सुद्धा संपले होते. परिस्थिती अशी निर्माण झाली होती की वेळेत औषध न मिळाल्यास हिमेश यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी मुंबईत असलेल्या नेहा देडीया यांनी ट्विटर च्या माध्यमातून सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली. केवळ 6 मिनिटांच्या आत सुषमा स्वराज यांनी नेहा देडीया यांच्या ट्विटर वरील विनंतीला प्रतिसाद देत तत्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले होते. Conclusion:या नंतर हिमेश देडीया यांना केवळ औषधांची मदत न पोहचली नाही तर हिमेश यांच्या सोबत दक्षिण सुदान मध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन संकटमोचन हाती घेऊन सर्व भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आलर होते. त्यावेळी जनरल विके सिंग हे 2 विमान घेऊन दक्षिण सुदान मध्ये दाखल झाले व 150 भारतीयांना घेऊन भारतात परतले होते.

सुषमा स्वराज यांच्या जाण्याने आपल्या कुटुंबातील कोणी जवळचा व्यक्ती गेल्याची भावना नेहा देडीया ह्या आज व्यक्त करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.