मुंबई - एम्सच्या डॉक्टरांनी अभिनेता सुशांतसिंहने आत्महत्याच केल्याचे स्पष्ट केल्यावरही सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकारण थांबत नाही. आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सुशांतच्या बहिणींवरच गंभीर आरोप लावले आहेत. तसेच तिची चौकशी करण्याची मागणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे आमदार सरनाईक यांनी केली आहे.
हेही वाचा - तेरा वर्षांचा 'विशेष' गिर्यारोहक; आशिया बुक ऑफ रॅकॉर्ड्सने केला गौरव
सुशांतला ठराविक औषधे देऊन, त्याला व्यसनाधीन करण्याचा आणि त्याची संपत्ती हडप करण्याचा त्याच्या कुटुंबीयांचा प्रयत्न होता का? याचाही तपास मुंबई पोलिसांनी केला पाहिजे. सुशांतच्या मालमत्तेसाठी कुटुंबीयांनीच सुशांतला ड्रग दिल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.
सुशांतसिंहची बहीण त्याला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काही औषधे देत होती, ज्यामुळे तो ड्रग्सच्या आहारी जाईल आणि त्याची प्रॉपर्टी हडप करता येईल, असा त्यांचा डाव होता का? या अँगलने तपास होण्याची गरज आहे. त्यामुळे मी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना यासंदर्भात तपास करण्याची विनंती केली असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.