मुंबई - सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय तपास करत असताना या संदर्भात रिया चक्रवर्ती वर सुशांतसिंहच्या कुटुंबातील सदस्यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांचे खंडन ज्येष्ठ वकील अशोक सरोगी यांनी केले आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात सुशांतसिंहची माझी मॅनेजर श्रुती मोदीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रुती मोदीचे वकीलपत्र सरोगी यांनी घेतले आहे. अशोक सरोगी यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे कागदोपत्री असे पुरावे आहेत जे सिद्ध करू शकतात ती सुशांतसिंह डिप्रेशनमध्ये असताना या संदर्भात सुशांतच्या कुटुंबाला माहिती होती.
अॅड. अशोक सरोगी यांची प्रतिक्रिया अशोक सरोगी यांनी म्हटले आहे, की त्यांच्याकडे असे काही कागद पुरावे आहेत ज्याने सिद्ध होते की 26 नोव्हेंबर 2019ला सुशांतसिंहच्या तीन बहिणी या मुंबईत त्याच्याजवळ उपस्थित होत्या. 27 नोव्हेंबर 2019ला सुशांत बहिणीसोबत पाटण्याला जाणार होता. यासाठी सुशांतने बिझनेस क्लास विमानाचे तिकीट सुद्धा बुक केले होत. मात्र, बहिणीसोबत जाण्या अगोदर त्याने त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारांच्या गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन श्रुती मोदी हीला विचारले असता, श्रुतीने सदरचे प्रिस्क्रिप्शन रिया चक्रवर्तीला माहित असल्याचा व्हॉट्सअॅप मेसेज केलेला होता. या दरम्यानच सुशांतचे त्याच्या तिन्ही बहिणींसोबतच भांडण झाले होते. तर दुसरीकडे अंमली पदार्थाच्या संदर्भात तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एकला अटक केल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून कळते. मात्र रिया चक्रवर्ती व अटक आरोपीचे काही संबंध आहेत का? याची पडताळणी सुरू असल्याचेही एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.हेही वाचा - रस्त्याच्या दुर्दशेमुळे कल्याण-डोंबिवलीकरांचे हाल; ८ तासाच्या नोकरीसाठी करावा लागतोय ५ तासांचा प्रवास