मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल केल्यानंतर सुशांतच्या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात ईडीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान आतापर्यंत ईडीने सुशांतचा चार्टर्ड अकाउंटंट, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा व सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांची चौकशी केली आहे. शुक्रवारी रिया चक्रवर्ती हीची तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर शनिवारी सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणी याचीसुद्धा ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. सिद्धार्थ पिठाणीला ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत.
सुशांतने 2018 ते 2020 पर्यंत 3 कंपन्या उघडल्या होत्या. या कंपन्यांपैकी एका कंपनीवर सुशांत, रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती हे तिघे संचालक होते. तर, आणखी एका कंपनीवर शोविक व सुशांत हे दोघे संचालक म्हणून दाखवण्यात आले आहेत. तिसऱ्या कंपनीवर सुशांत, वरूण माथूर, सौरभ मिश्रा हे तिघे संचालक असून गुरुग्राम येथील कार्यालयाचा पत्ता दाखवण्यात आला आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या कंपन्या -
1) सुशांतसिंह याच्यासोबत रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांनी 'फ्रंट इंडिया वर्ल्ड फाऊंडेशन ही कंपनी 6 जानेवारी 2020 मध्ये सुरू केली. यातील शेअर कॅपिटल 1 लाख रुपये तर पेड कॅपिटल 1 लाख रुपये होते. या कंपनीवर सुशांत आणि शोविक चक्रवर्ती हे दोघे संचालक होते. सोशल वर्क करण्याचा संदर्भात कंपनी काम करत होती.
- या कंपनीचा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन क्रमांक - U85300NP2020NPL335524
- कंपनी रजिस्ट्रेशन क्रमांक - 335524
- पत्ता - फ्लॅट नंबर 503, साई फॉर्च्युन प्लॉट 15, सेक्टर 8 उलवे नवी मुंबई.
2) सुशांतसिंहची उद्यम इनसे उद्यम प्रायव्हेट लिमिटेड ही 6 एप्रिल 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. यातील शेअर कॅपिटल 1 लाख रुपये तर पेड कॅपिटल 1 लाख रुपये होते. या कंपनीवर सुशांत. वरूण माथूर, सौरभ मिश्रा हे संचालक होते.
- या कंपनीचा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन क्रमांक - U930HR2018PTC073830
- कंपनी रजिस्ट्रेशन क्रमांक - 73830
- पत्ता - b-204 दि जुडा को-ऑपरेटीव जीएच 1 सेक्टर 56 गुरुग्राम.
3) विविद्रीग रिहालिटी प्रायवेट लिमिटेड ही कंपनी 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. या कंपनीचे शेअर कॅपिटल 1 लाख व पेड कॅपिटल 1 लाख होते. कॉम्प्यूटर मेंटनेंस आणि वेबसाईट संदर्भात मेंटेनस व प्रेझेंटेशचे काम ही कंपनी करत होती. कंपनी संचालक म्हणून सुशांत, शोविक चक्रवर्ती व रिया चक्रवर्ती यांची नावे आहेत.
- या कंपनीचा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन क्रमांक - U72900MH2019PTC330454
- पत्ता - फ्लॅट नंबर 503, साई फॉर्च्युन प्लॉट 15, सेक्टर 8 उलवे नवी मुंबई.