ETV Bharat / city

shivsena petition in SC : १६ आमदारांचे भवितव्य उद्या होणार निश्चित, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असणार पहिले प्रकरण

author img

By

Published : Aug 3, 2022, 7:19 AM IST

Updated : Aug 3, 2022, 1:27 PM IST

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray plea in SC ) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने शिंदे सरकार स्थापनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

शिंदे सरकार सर्वोच्च न्यायालय
शिंदे सरकार सर्वोच्च न्यायालय

मुंबई- महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात ( supereme court hearing ) पोहोचलेला आहे. या सत्ता संघर्षातील 16 बंडखोर आमदारांना निलंबित करण्याच्या मागणी विरोधात शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी उपाध्यक्ष यांच्या आदेशाला अहवाल देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होते. या याचिकेवर 20 जुलै रोजी सुनावणी देखील करण्यात आली होती. त्यावेळी या याचिकेवर मोठ्या खंडपीठांसमोर सुनावणी घेण्याची तयारी सरन्यायाधीश यांनी दाखवली होती. शिंदे गटाचे वकील हरिश साळवे याचिका दुरुस्त करून दाखल करणार आहेत. तर आमदार अपात्रतेवर उद्या सुनावणी होणार आहे. कामकाजात पहिले प्रकरण असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही - महाराष्ट्र सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेच्या चिन्हावरून शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना पक्षावर दोन्ही गट दावा करत आहेत. आता यात नेमका दावा कुणाचा योग्य हे ठरवण्यासाठी आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नोटीस बजावलेली आहे. या नोटीसलाही शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

आमदारांची सुप्रीम कोर्टात याचिका - या नोटीसीनंतर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शिवसेनेतील वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. शिवसेनेतील निवडणूक आंदोलन अपात्र त्याची कारवाई उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर शिंदे गटाने आमदारांनी र्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, तसेच, सरकार स्थापनेतही अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.

पूर्ण देशाचे लक्ष सुनावणीकडे? - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप शिंदे गटाचे सरकार सत्तेवर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल शिवसेनेचे ४० बंडखोर आमदारांना आपल्या पाठीशी घेऊन राज्यात सत्तांतर केले. हे सरकार बेकायदेशीर असून शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्याची याचिका शिवसेनेने दाखल केली होती. यामुळे या सुनावणीकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

हेही वाचा-हेही वाचा-Eknath Shinde on Uday samant : गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हेही वाचा- Eknath Shinde : निवडून येण्यासाठी मला निवडणूक चिन्हाची गरज नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर बाण

हेही वाचा- Attack on Uday Samant Vehicle : उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा कात्रज चौकात हल्ला, गाडीची तोडफोड

etv play button
Last Updated : Aug 3, 2022, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.