ETV Bharat / city

रेड्डीज लॅबोरेटरीजकडून मुंबई महापालिकेला स्पुटनिक लसीचा जून अखेरीस पुरवठा - स्पुटनिक लस

स्पुटनिक लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासमवेत मुंबई महानगरपालिका प्रशासनाची चर्चा सुरु आहे. सुरुवातीला जूनच्या अखेरीस प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात लसीचा साठा दिला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

स्पुटनिक लस
स्पुटनिक लस
author img

By

Published : Jun 4, 2021, 10:33 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू केली. लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने ग्लोबल टेंडरही काढण्यात आले. मात्र, पुरवठादारांकडे कायदेशीर कागदपत्रे नसल्याने टेंडर रद्द करण्यात आले. यादरम्यान स्पुटनिक लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासमवेत महानगरपालिका प्रशासनाची चर्चा सुरु आहे. सुरुवातीला जूनच्या अखेरीस प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात लसीचा साठा दिला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

पालिकेचे ग्लोबल टेंडर -

कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. मुंबईमध्ये दीड कोटी नागरिक राहत असून त्यांचे लसीकरण लवकरात लवकर करता यावे, यासाठी पालिकेने राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे लसीची मागणी केली. त्यानंतरही लसीचा पुरवठा हवा तसा होत नसल्याने अनेकवेळा लसीकरण ठप्प झाले. मुंबईकरांचे लसीकरण करता यावे म्हणून पालिकेने लसीच्या पुरवठयासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पुरवठादार कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले. 10 पुरवठादार कंपन्यांनी प्रस्ताव पाठवले होते. मात्र, त्यापैकी एका कंपनींने माघार घेतल्याने 9 पुरवठादार राहिले होते. या 9 पुरवठादारांच्या कागदपत्रांची तसेच लस उत्पादक कंपनीसोबत असणाऱ्या त्यांच्या कायदेशीर संबंधांची तपासणी केली जात होती. यासाठी पालिकेचे दोन अतिरिक्त आयुक्त काम करत होते. पुरवठादार आणि लस बनवणाऱ्या कंपन्या यांच्यामधील कायदेशीर बाबी तपासल्या गेल्या. त्यानंतर एकही पुरवठादार कंपनी 1 कोटी लसीचा पुरवठा करू शकत नाही, हे स्पष्ट झाल्याने पालिका प्रशासनाने ग्लोबल टेंडर रद्द कारण्याचा निर्णय घेतला आहे.

जून अखेरपर्यंत काही लसीचा साठा मिळणार -

पालिकेच्या ग्लोबल टेंडरसाठी प्रस्ताव देणारे 9 पुरवठादार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना लसीचा साठा मिळेल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. याच दरम्यान महापालिका प्रशासनाने कोविड लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेता, स्पुटनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी आज संपर्क साधला. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा महापालिकेला देण्याची तयारी दर्शविली आहे. हा साठा जून 2021 अखेरपर्यंत देण्याची तयारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दर्शविली आहे. स्पुटनिक लसीच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत. त्यामुळे हा साठा मिळाल्यानंतर त्यांच्या शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी करण्यात येईल. तसेच जुलै व ऑगस्ट 2021 या दोन महिन्यांमध्ये स्पुटनिक लसीचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबत देखील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याकडे विचारणा करण्यात आली आहे. याअनुषंगाने येत्या आठ ते दहा दिवसांत पुन्हा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासमवेत चर्चा केली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.