ETV Bharat / city

काँग्रेस कार्यकर्त्यांची नार्को टेस्ट केल्यास, कित्येकजण भाजपमध्ये येण्यास उत्सुक असतील - मुनगंटीवार

आम्ही दरवाजे खुले केले तर काँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्तेही शिल्लक राहणार नाहीत, असा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला लगावला.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : May 22, 2019, 10:03 AM IST

मुंबई - मतदानोत्तर चाचणीत भाजपला यश मिळत असल्याचे लक्षात येताच भाजप कार्यकर्त्यांसह नेतेही जल्लोषात आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांची नार्को टेस्ट केल्यास कित्येक कार्यकर्तेही भाजपमध्ये येण्याच्या तयारीत असतील, असे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. वसंत स्मृत्ती या भाजप कार्यालयात ते बोलत होते. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते विजय सिंह मोहिते पाटील यांच्यानंतर कोण? अशी विचारणा पत्रकारांनी करताच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

विरोधकांना आता बोलायला काहीच शिल्लक नसल्याने ते ईव्हीएम बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. विरोधी पक्षात असलेले कार्यकर्तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कंटाळले आहेत. लोकसभेत भाजपला घवघवीत यश मिळणारच आहे. पण आणखी अभ्यास करून भाजपचा पदाधिकारी मैदानात उतरून विधानसभेतही काँग्रेस-राष्ट्रवादीला चारीमुंड्या चित करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या पायाखालची वाळू घसरत असल्यानेच ते मोदी यांच्यावर खालच्या स्तरावर टीका करत असल्याचे ते म्हणाले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

जे पंतप्रधान देवाचे केवळ दर्शन घेत नाही तर तिथल्या (केदारनाथ) सर्व समस्यांचे निराकरण करतात, त्यांना नौटंकी म्हणणे ही विरोधकांची दिवाळखोरी आहे, असेही मुंगणटीवार यांनी सांगितले. आम्ही दरवाजे खुले केले तर काँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्तेही शिल्लक राहणार नाहीत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. निकालाच्या दिवशी कार्यकर्ते अधिक जल्लोषात विजय साजरा करतील. एनडीएची निकलापूर्वीची बैठक ही आनंद वाढवण्यासाठी आहे तर युपीएची बैठक दुःख वाटून घेण्यासाठी आहे, अशी कोपरखळीही त्यांनी विरोधकांना मारली.

Intro:सूचना- सुधीर मुनगंटीवार यांचे फीड LIVE U वरून पाठवले आहे..

काँग्रेस कार्यकर्त्यांची नार्को टेस्ट केल्यास, कित्येक जण भाजप मध्ये जाण्यास उत्सुक असतील- सुधीर मुनगंटीवार

मुंबई 22

मतदाणोत्तर चाचणीत भाजपला यश मिळत असल्याचे लक्षात येताच भाजप कार्यकर्त्यांसह नेतेही जल्लोषात आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांची नार्को टेस्ट केल्यास कित्येक कार्यकर्ते ही भाजप मध्ये येण्याच्या तयारीत असतील असे जेष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. वसंत स्मुत्ती या भाजप कार्यालयात ते बोलत होते. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते विजय सिंह मोहिते पाटील यांच्या नंतर कोण भाजपच्या वाटेवर असल्याची विचारणा पत्रकारांनी करताच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

विरोधकांना आता बोलायला काहीच शिल्लक नसल्याने ते ईव्हीएम बाबत प्रश्नचिन्ह उपस्तिथ काइत आहेत. विरोधी पक्षात असलेले कार्यकर्ते ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कंटाळले आहेत. लोकसभेत भाजप घवघवीत यश मिळणारच आहे. पण आणखी अभ्यास करून भाजपचा पदाधिकारी मैदानात उतरून ,विधानसभेत ही काँग्रेस -राष्ट्रवादीला चारी खाणे चित करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या पायाखालची वाळू घसरत असल्यानेच ते मोदी यांच्यावर खालच्या स्तरावर टीका करत असल्याचे ते म्हणाले.
जो प्रधानमंत्री देवाचे केवळ दर्शन घेत नाही तर तिथल्या ( केदारनाथ) सर्व समस्यांचे निराकरण करतात, त्यांना नौटंकी म्हणणे ही विरोधकांची दिवाळखोरी आहे असेही मुंगणटीवार यांनी सांगितले.
आम्ही दरवाजे खुले केले तर काँग्रेसच्या कार्यलयात कार्यकर्तेही शिल्लक राहणार नाहीत अशी टीका ही त्यांनी यावेळी केली.
निकालाच्या दिवशी कार्यकर्ते अधिक जल्लोषात विजय साजरा करतील. एनडीएची निकलापूर्वीची बैठक ही आनंद वाढवण्यासाठी आहे तर युपीए ची बैठक दुःख वाटून घेण्यासाठी आहे, अशी कोपरखळी ही त्यांनी विरोधकांना मारली. Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.