ETV Bharat / city

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांचे फेरप्रस्ताव सादर करा - वैद्यकीय शिक्षणमंत्री

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दि. २ जून २०२१ पासून विविध विद्याशाखांच्या हिवाळी-२०२० पदवी परीक्षा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील कोविड विषयक सध्य परिस्थिती पहाता तसेच राज्यातील कडक निर्बंध पहाता परीक्षेच्या नियोजन संदर्भामध्ये तसेच वेळापत्रकासंदर्भात सर्व संबंधितांनी चर्चा करुन निर्णय घ्यावा आणि तसा प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करावा असे निर्देश देशमुख यांनी दिले.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
author img

By

Published : May 15, 2021, 1:48 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या २ जूनपासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा करुन फेरप्रस्ताव शासनास पाठवावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

आरोग्य विद्यापीठाच्या विविध शाखांच्या परीक्षा वेळापत्रकांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ऑनलाईन बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव विजय सौरभ, विद्यापीठाचे प्रभारी-कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यापीठाचे विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक बैठकीस उपस्थित होते.

परीक्षांचे नियोजन करा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दि. २ जून २०२१ पासून विविध विद्याशाखांच्या हिवाळी-२०२० पदवी परीक्षा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील कोविड विषयक सध्य परिस्थिती पहाता तसेच राज्यातील कडक निर्बंध पहाता परीक्षेच्या नियोजन संदर्भामध्ये तसेच वेळापत्रकासंदर्भात सर्व संबंधितांनी चर्चा करुन निर्णय घ्यावा आणि तसा प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करावा असे निर्देश देशमुख यांनी दिले.

वेळापत्रकाबाबत चर्चा करावी

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी-२०२१ परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित होत्या. सदर परीक्षा या आधीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक जाहिर होणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत सर्व संबंधितांनी चर्चा करुन निर्णय घ्यावा आणि तसा प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी दिले.Conclusion:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.