मुंबई- रायगड जिल्हयातील उरण, पनवेल, पेण तालुक्यातील महामुंबई सेझसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ( land for SEZ in Raigad ) बातमी आहे. महामुंबई सेझसाटी संपादित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेली सुनावणी तीन महिन्यात ( Hearing on lands taken for SEZ ) पुर्ण करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली.
महामुंबई सेझ लिमिटेड या कंपनीसाठी उरण पेण, पनवेल तालुक्यातील १५०४ हेक्टर जमीन सरकारने संपादीत केली होती. प्रत्यक्ष प्रकल्प न झाल्याने सदरची जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, त्याला विलंब होत असल्याचे लक्ष आमदार ॲड आशिष शेलार ( Ashok Shelar on SEZ in Raigad ) यांनी वेधले. सरकारकडून जमिनी परत करण्यास का विलंब करीत आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.
हेही वाचा-Action Of Anti-Drug Squad : 8 लाख 20 हजाराचे ड्रग्ज, नायजेरियन महिलेसह दोघांना अटक
सुनावणी घेऊन जमीन परत करणार
उत्तर देताना उद्योग मंत्र्यांनी ( Subhash Desai in Vidhansabha ) सांगितले की, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे. या सुनावणी लवकरात लवकर करून कार्यवाही पुर्ण करण्यात येईल. तीन महिन्यात सुनावणी पुर्ण करण्यात येईल, अशी त्यांनी ग्वाही दिली. या चर्चेत सहभागी होताना आमदार महेश बादली यांनी याबाबत स्थानिक लोकप्रतिनींधीची बैठक घ्यावी अशी मागणीही केली.
सेझ विरोधी संघर्ष समिती आक्रमक
तिसरी महामुंबई म्हणून ओळख निर्माण झालेल्या पेण परिसरात विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) पुन्हा डोके वर काढू लागले आहे. नुकतेच सेझ विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी 24 गावे सेझ विरोधी संघर्ष समितीची महत्वपूर्ण बैठक पेण येथे झाली आहे. सेझसाठी दिलेल्या शेत जमीनी शेतकऱ्यांना परत कशा मिळवून देता येतील यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.