मुंबई - कोरोनाच्या काळात विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी आता चिनी बनावटीच्या अॅडोब स्कॅन तसेच कॅमस्कॅनरसारख्या अॅप्सना पर्याय दिला आहे. यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ‘एआयआर स्कॅनर’ हे अॅप विकसित केले आहे. रोहित कुमार चौधरी आणि केविन अग्रवाल अशी हे अॅप विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
भारत-चीन सीमेवर काही महिन्यांपूर्वी झालेल्या झटापटीनंतर भारत सरकारने काही चिनी बनावटीच्या अॅपवर बंदी घातली होती. परिणामी विविध सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये, तसेच खासगी वापरासाठी अनेक प्रकारची कागपत्रे स्कॅन करण्यासाठी सर्वाधिक वापरात असलेले कॅमस्कॅनर हे अॅपही बंद पडले होते. हे ॲप बंद पडल्यामुळे अनेकांना यासाठी पर्यायी अॅपचा वापर करावा लागत आहे. मात्र, सध्या वापरात असलेले अनेक ॲप हे देशात असलेली मागणी आणि त्यासाठीची गरज पूर्ण करू शकत नाहीत. या पार्श्वभुमीवर उपाय म्हणून आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ‘एआयआर स्कॅनर’ हे अॅप विकसित केले आहे.
'एआयआर स्कॅनर’ हे अॅप सध्या गुगल प्ले स्टोअर उपलब्ध असून हे सहजपणे डाउनलोड करून घेता येते. या ॲपच्या माध्यमातून केवळ स्कॅनरच नव्हे तर ईबुक्स किंवा वृत्तपत्राची कात्रणे अपलोड केली जातात आणि त्याहीपेक्षा पुढचे पाऊल म्हणजे डाउनलोड केलेली कागदपत्रे वाचून दाखविण्याचे कामही हे अॅप करते. यामध्ये ‘एआय नॅरेटर’ बसविण्यात आले आहे. यापूर्वी हे अॅप कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून वाचन करुन देण्यासाठी कार्यरत होत असते, अशी माहिती रोहित कुमार चौधरी यांनी दिली.
'एआयआर स्कॅनर’ हे अॅपवर तब्बल ४० भारतीय आणि इतर भाषांतील भाषांतरे उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन केल्यानंतर त्या कागदपत्रावरील शब्दाचे अर्थ त्या त्या भाषांमध्ये सांगण्याचे कामही हे अॅप करणार असल्याची माहिती केविन अग्रवाल यांनी दिली.
आयआयटीमुंबईच्या विद्यार्थ्यांनी शोधला ‘एआयआर स्कॅनर’; चिनी बनावटीच्या अॅपला दिला भारतीय पर्याय - केविन अग्रवाल
'एआयआर स्कॅनर’ हे अॅप सध्या गुगल प्ले स्टोअर उपलब्ध असून हे सहजपणे डाउनलोड करून घेता येते. या ॲपच्या माध्यमातून केवळ स्कॅनरच नव्हे तर ई-बुक्स किंवा वृत्तपत्राची कात्रणे अपलोड केली जातात आणि त्याहीपेक्षा पुढचे पाऊल म्हणजे डाउनलोड केलेली कागदपत्रे वाचून दाखविण्याचे कामही हे अॅप करते.