मुंबई - नायर रुग्णालयात ( Nair Hospital ) ऑक्युप्रेशर थेरपीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ( Suicide of student at Nair hospital) केल्याचा प्रकार समोर आला आहे. श्रेयसी पाटकर (२८) असे तिचे नाव होते. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नसून याप्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद केली आहे.
कारण अद्याप अपष्ट - ती आग्रीपाड्यातील चांदोरकर मार्गावर असलेल्या साई सोसायटीत श्रेयसी आई वडिल, भावासोबत राहत होती. ती नायर रुग्णालयातील मेडिकल कॉलेजात ऑक्युप्रेशर थेरपीचे शिक्षण घेत होती. गुरूवारी दुपारी घरात कोणी नसताना श्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात कुठलीही सुसाईड नोट सापडली नाही. अभ्यासाचा ताण तसेच आजारपणाला वैतागून तिने असे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक पाचे यांनी सांगितले.